Jos Buttler Alex Hales 132 Runs Opening Partnership esakal
क्रीडा

AUS vs ENG : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला धुतले! बटलर - हेल्स जोडीने केली 27 चौकार, षटकारांची बरसात

अनिरुद्ध संकपाळ

Jos Buttler Alex Hales AUS vs ENG : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात चांगलेच धुतले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडचे सलामीवीर जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी कांगारूंची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी तब्बल 132 धावांची सलामी दिली. या दोघांनी मिळून 20 चौकार आणि 7 षटकारांची आतशबाजी केली. या दोघांच्या या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकात 8 बाद 208 धावा कुटल्या.

भारतातील टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन हिरो ठरला होता. या हिरोची सगळी हिरोगिरी इंग्लंडच्या सलामीवीरांनी पहिल्याच षटकात काढून घेतली. बटलरने ग्रीनच्या पहिल्याच षटकात दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारत 16 धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूने अॅलेक्स हेल्सने रिचर्डसनला पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपले खाते उघडले.

बटलर आणि हेल्स यांनी दोन्ही बाजूंनी ऑस्ट्रेलियावर आक्रमण करत पहिल्या 7 षटकात 72 धावा ठोकल्या. बटलरने 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. तर हेल्सने 29 चेंडूत चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी पहिल्या 10 षटकात 118 धावा ठोकल्या होत्या. 132 धावांची ही सलामी जोडी अखेर नॅथन एलिसने फोडली. त्याने बटलरला 68 धावांवर बाद केले. बटलरने 32 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांनी ही 68 धावांची खेळी सजवली.

दरम्यान, शतकाकडे कूच करणाऱ्या हेल्सला रिचर्डसनने टीम डेव्हिडकरवी झेलबाद केले. हेल्सने 51 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकार मारत 84 धावा चोपल्या. बटलर आणि हेल्स वर्ल्डकपपूर्वी चांगल्याच फॉर्ममध्ये आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT