Police investigating the crime scene where a Kabaddi player was shot dead in Mansa, Punjab — locals gather as the incident sparks outrage.

 

esakal

क्रीडा

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Kabaddi player shot dead : एसएसपी कार्यालयाच्या काही अतंरावरच आरोपींनी गोळीबार केल्याचे आले होते समोर

Mayur Ratnaparkhe

Kabaddi Player Shot Dead in Mansa City of Punjab :पंजाबमधील मानसा येथे एक खळबळजनक अशी गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एका कबड्डी खेळाडूचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी आधी या कबड्डीपटूवर हल्ला केला आणि नंतर त्याच्यावर गोळीबार केल्याचे वृत्त आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळापासून एसएसपी कार्यालय थोड्याच अंतरावर आहे, तरीही या आरोपींनी हा गुन्हा केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला चकमकीत ठार मारले आहे. तर अन्य एकास अटक केली आहे.

मृताची कब्बडीपटूची ओळख तेजपाल सिंग अशी समोर आली आहे. तेजपाल त्याच्या दोन मित्रांसह हरी सिंग हॉस्पिटल रोडजवळ होता तेव्हा अज्ञात तरुण आले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. यानंतर काही क्षणातच या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे कबड्डीपटू तेजपाल सिंगचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, यानंतर मानसा पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील एका आरोपीला ठार केले आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ शहरातील रहिवाशांनी शनिवार, १ नोव्हेंबर रोजी निषेध मोर्चा जाहीर केला होता. ज्यामुळे पोलिसांना तातडीने कारवाई करत आरोपींपैकी एक गुरसाहब सिंग रोपारचा एन्काउंटर करावा लागल्याचं बोललं जात आहे. तर दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याचबरोबर मानसाच्या एसएसपींनी माहिती देताना सांगितले की, आरोपींकडून दोन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीसंदर्भात पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: स्वतःला देव समजणारा राक्षस! ३५० जणांना संपवलं, ११० अल्पवयीन मुलींचा समावेश, कारण... वाचा सर्वात कुख्यात सिरीयल किलरची कहाणी

त्याच्यावरून संस्कार नाही ठरत... रेणुका शहाणेंनी मांडलं मत; म्हणतात- काही जणी पदर घेतात पण इतक्या घाणेरड्या...

DMart Discount Offers : डीमार्टमध्ये सामान एवढं स्वस्त देणं मालकाला परवडतं कसं? डिस्काउंट ऑफरमागं आहे सिक्रेट..समोर आलं शॉकिंग कारण

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या कोंढव्यात गँगवारमधून गणेश काळेची हत्या

Akshay Nagalkar Murder Case : बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणातील ९ आरोपी अटकेत; मृतकाचे हाडांचे तुकडे, दोन देशी पिस्तुल अन् वाहनेही जप्त

SCROLL FOR NEXT