kambala runner nishant shetty breaks srinivasa gowda record 
क्रीडा

आणखी एक इंडियन उसेन बोल्ट सापडला; 9.51 सेकंदांत गाठले 100 मीटर

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू (कर्नाटक) : गेल्या तीनच्या दिवसात श्रीनिवास गौडा हे नाव देशभरात नव्हे तर, जगभरात चर्चेत आलं. कारण, जगातील सर्वांत वेगवान धावपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसेन बोल्ट पेक्षा वेगानं धावण्याचा पराक्रम श्रीनिवासनं केला होता. आता श्रीनिवासपेक्षाही वेगानं धावणारा तरुण चर्चेत आला. होय. विशेष म्हणजे कर्नाटकमधूनच तो सापडला असून, निशांत शेट्टी असं त्या तरुणाचं नाव आहे.

कंबाला शर्यतीत श्रीनिवास गौडानं 9.55 सेकंदांत 100 मीटर अंतर पार करून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. सगळ्यांनी त्याची तुलना उसेन बोल्टशी केली. सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर झाले. अगदी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि त्याला शास्त्रोक्त धावण्याचं ट्रेनिंग देण्याची तयार दर्शवली आहे.  पण, त्याचं हे रेकॉर्ड फार काळ टिकलं नाही. कारण, पारंपरिक म्हशींच्या शर्यतीत निशांत शेट्टी हे आणखी एक नाव पुढं आलंय. म्हशींच्या शर्यतीचं 143 मीटरचं अंतर निशांत शेट्टीनं 13.68 सेकंदांत पार केलंय. त्यात त्यानं 100 मीटर अंतर केवळ 9. 51 सेकांदांत पार केलंय. त्यामुळं निशांतनं आता श्रीनिवासला मागं टाकलंय. निशांत हा मूळचा बजागोळी जोगीभट्टूचा आहे. वेन्नूरच्या कंबाला शर्यतीत त्यानं वेगानं धावून सगळ्यांचं लक्ष वेधलंय.

काय आहे कंबाला शर्यत?
कंबाला शर्यत ही कर्नाटकमधील पारंपरिक म्हशींची शर्यत आहे. प्रामुख्यानं दक्षिण कन्नडा आणि उडुपी जिल्ह्यात या म्हशींच्या शर्यतींचं आयोजन केलं जातं. यात म्हशींच्या जोडीसह एक व्यक्ती धावतो. तिघं किती वेळेत शर्यतीचं अंतर पार करतात. त्यावर विजेता ठरतो. श्रीनिवास आणि निशांत दोघंही या शर्यतीच्या माध्यमातून प्रतिद्धीच्या झोतात आले आहेत. 

निशांतलाही प्रशिक्षणाची ऑफर 
श्रीनिवास संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेली माहिती वाचून केंद्र क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी त्याची दखल घेतली आणि त्याला स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्या बेंगळुरू येथील केंद्रात श्रीनिवासला विशेष प्रशिक्षण देण्याची तयार दर्शवली. दुसरीकडं श्रीनिवासनं अतिशय नम्रपणे ही ऑफर नाकारली आहे. आता निशांतला अशी ऑफर मिळते का? आणि तो या संदर्भात काय भूमिका घेतो, याची उत्सुकता लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atharva Sudame: “महिला प्रवाशांच्या प्रतिष्ठेला हानी…”; पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामेला PMPML ची नोटीस, ही रील ठरली कारण

Latest Marathi News Live Update : महायुतीची कोल्‍हापुरात आज 'शंखनाद विजयाचा' सभा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

बिनविरोधसाठी खून, माघारीच्या शेवटच्या दिवशी राडा; मतदानाआधीच ६७ जण विजयी, भाजपचे सर्वाधिक

Pune Airport : प्रवाशांना दिलासा; पुणे विमानतळावर ‘ग्रीन चॅनेल’, ४० ते ५० मिनिटांची होणार बचत

MSRTC New Bus Pass Scheme: रोज बसने प्रवास करताय? मग MSRTC ची नवीन पास योजना जाणून घ्या, प्रवास होईल एकदमभारी!

SCROLL FOR NEXT