IPL 2023 Auction Adil Rashid sakal
क्रीडा

IPL 2023 Auction : ... अन् काव्या मारनची कळी खुलली, हैदराबादने चॅम्पियन खेळाडू लावला गळाला

Kiran Mahanavar

IPL 2023 Auction Adil Rashid in SunRisers Hyderabad : IPL 2023 च्या मिनी लिलावाची चर्चा जोरात सुरू आहे. फलंदाजांसोबतच गोलंदाजांवरही फ्रँचायझी खूप पैसा खर्च करत आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असते. 16व्या हंगामासंदर्भात कोचीमध्ये 87 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होत आहे. दुसरीकडे इंग्लंडचा अव्वल दर्जाचा लेग स्पिनर आदिल रशीदला सनराईजर्स हैदराबादने 2 कोटींनी खरेदी करत आपल्या कळपात सामील करून घेतले. राशीद स्वस्तात हाताला लागल्याने काव्या मारची कळी खुलली होती.

आदिल रशीदच्या टी-20 विश्वचषक 2022 मधील कामगिरीवर नजर टाकली तर या खेळाडूने खूप प्रभावित केले आहे. आदिल रशीदने सर्व सामन्यांमध्ये त्याच्या कोट्यातील पूर्ण 4 षटके टाकली, यादरम्यान विरोधी फलंदाज आदिल रशीदविरुद्ध केवळ 6.12 च्या इकॉनॉमीसह धावा करू शकले. त्यामुळे हैदराबाद संघाने या खेळाडूला खरेदी केले. सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंच्या यादीत आदिल रशीदचा समावेश आहे. तो इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. रशीद याआधी पंजाब किंग्जकडून खेळला आहे.

2022 चा टी-20 विश्वचषक इंग्लंडने जिंकला. त्याचबरोबर इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीदने या स्पर्धेत चांगलीच छाप पाडली. आदिल इंग्लंडकडून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने 19 कसोटी सामन्यांमध्ये 60 विकेट घेतल्या आहेत. तर टी-20 93 आणि ODI मध्ये 169 विकेट घेण्यात यश आले आहे. अशा परिस्थितीत आयपीएलचा कोणताही फलंदाज या गोलंदाजाला हलके घेऊ इच्छित नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : 'सरकारने विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करू नये; हमी मिळाली तर आजच उपोषण सोडेन' – सोनम वांगचुक

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT