kiran Navgire Set for Debut as India Against England sakal
क्रीडा

Indw vs Engw : महाराष्ट्राची लेक किरण नवगिरे करणार पदार्पण? इंग्लंडविरुद्ध भारतची Playing-11

कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे.

Kiran Mahanavar

ENG-W vs IND-W 1st T20I Prediction Playing XI : कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघ तीन सामन्यांच्या T20 मालिकेला आजपासुन सुरुवात करणार आहे. पहिला सामना शनिवारी रात्री चेस्टर ली स्ट्रीटवर खेळवला जाईल.

भारतीय महिला क्रिकेट संघची यष्टीरक्षक तानिया भाटिया संघाबाहेर असून महाराष्ट्राच्या किरण प्रभू नवगिरेची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. किरणचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. नवगिरे ही पॉवर हिटर आहेत. त्यामुळे संघात पदार्पण करेल अशी आशा आहे. महिला क्रिकेट संघासाठी हा दौरा खूप खास असणार आहे कारण संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा हा शेवटचा दौरा आहे. त्यानंतर ती एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेनंतर झुलन क्रिकेटला अलविदा करणार आहे.

पहिल्या T20 साठी भारत आणि इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

  • इंग्लंड : डॅनियल व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, ब्रायोनी स्मिथ, एमी जोन्स, माइया बाउचियर, सोफी एक्लेस्टोन, केट क्रॉस, फ्रेया केम्प, इस्सी वोंग, सारा ग्लेन

  • भारत : स्मृति मंधाना, शैफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स/किरण नावगिरे, हरमनप्रीत कौर, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, तानिया भाटिया, राधा यादव, मेघना सिंह, रेणुका ठाकुर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT