KL Rahul  Asia Cup 2023
KL Rahul Asia Cup 2023 esakal
क्रीडा

Asia Cup 2023: केएल राहुल आशिया कपमधुन बाहेर? दिग्गज खेळाडू करू शकतो पुनरागमन

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. श्रेयस अय्यरला बॉर्डर-गावसकर स्पर्धेदरम्यान पाठीला दुखापत झाली होती. आता तो सावरण्याच्या मार्गावर आहे, तर केएल राहुलसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यर आशिया कप 2023 साठी उपलब्ध होऊ शकतो. मात्र, केएल राहुल आशिया कपसाठी तंदुरुस्त असण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय जसप्रीत बुमराहचे आयर्लंड मालिकेतून पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

केएल राहुलने अद्याप फलंदाजीचा सराव सुरू केलेला नाही आणि तो आयर्लंडविरुद्ध मालिकेतून बाहेर पडण्याची खात्री आहे. आशिया चषकासाठी तो वेळेत तंदुरुस्त होऊ शकेल की नाही हे आता प्रश्नचिन्ह आहे. अय्यरला त्याच्या पाठीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया करावी लागली तर राहुलला IPL 2023 मध्ये झालेल्या मांडीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया करावी लागली.

आशिया कप 2023 च्या आधी दुखापतीचे अपडेट :

श्रेयस अय्यर : मधल्या फळीतील फलंदाजाने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजीला सुरुवात केली आहे. पाठदुखीच्या दुखापतीतून त्याची रिकव्हरी पुन्हा रुळावर आली आहे. अय्यर भारतविरुद्ध आयर्लंड टी-T20 मालिकेला मुकणार आहे. मात्र 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत पुनरागमन करू शकतो. पूर्ण तंदुरुस्तीसाठी त्याच्याकडे 45 दिवस आहेत.

केएल राहुल : दुखापतींमुळे केएल राहुलसाठी ही चढ-उतारांची लढाई आहे. मांडीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आशिया चषक सुरू होण्यास अवघे 45 दिवस उरले असून राहुलने अद्याप फलंदाजीचा सराव सुरू केलेला नाही. आणि बीसीसीआयसाठी ही चिंतेची बाब आहे.

कर्नाटकचा हा डॅशिंग खेळाडू आयर्लंड मालिकेला मुकणार हे नक्की आहे. तो आशिया चषक स्पर्धेत स्थान मिळवू शकेल की नाही हे पुढील महिन्यात त्याची रिकव्हरी कशी होते यावर अवलंबून असणार आहे.

जसप्रीत बुमराह फिटनेस अपडेट : चांगली बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह हा प्रमुख वेगवान गोलंदाज तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. बुमराहने एनसीएमध्ये सराव करताना उत्साहाने गोलंदाजी सुरू केली आहे. तो आयर्लंड मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT