KL Rahul left out for India T20I squad against Sri Lanka t20 series against sri lanka  esakal
क्रीडा

केएल राहुल संघातील स्थान अन् उपकर्णधरापदालाही मुकला; श्रीलंकेविरोधात 'अशी' असेल टीम इंडिया

सकाळ डिजिटल टीम

Team India Squad Announced : टीम इंडिया नवीन वर्षात सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील बडतर्फ निवड समितीनेच या मालिकेसाठी टीम इंडिया संघ निवडला आहे.

या टी-20 सीरिजसाठी हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळणार असून केएल राहुलला मात्र संघातून डावलण्यात आलं आहे. त्याचबरोबर फक्त एकदिवसीय सीरीजमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

या खेळाडूंना टी-20 संघातून वगळलं

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि ऋषभ पंत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाहीत. त्याचबरोबर मुकेश कुमार आणि शिवम मावी या युवा खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या जागी इशान किशन आणि संजू सॅमसन यष्टिरक्षक म्हणून संघात सामील झाले आहेत.

वर्षभर राहुलची कामगिरी सुमारच…

फलंदाजीच्या बाबतीत 2022 हे वर्ष रोहित आणि केएल राहुल या दोघांसाठी काही खास राहिलेले नाही. राहुलने त्याच्या खराब कामगिरीमुळे संघातील स्थान अन् उपकर्णधरापदालाही गमावलं आहे. केएल राहुलने दहा कसोटी सामने खेळले आणि 17.12 च्या सरासरीने केवळ 137 धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने एक अर्धशतक झळकावले. तर 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 27.88 च्या सरासरीने 251 धावा केल्या आणि दोन अर्धशतके केली. यामध्ये 73 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

राहुलने 2022 मध्ये 16 टी-20 सामन्यांमध्ये 28.93 च्या सरासरीने 434 धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा अर्धशतके केली आणि 62 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यावर्षी राहुलने 30 सामन्यांत 25.68 च्या सरासरीने 822 धावा केल्या. यामध्ये नऊ अर्धशतके आहेत.

सूर्यावर मोठी जबाबदारी

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 2022 मध्ये तो T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

टी-20 सीरीजसाठी कशी असेल टीम इंडिया

हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: १४ किमी सायकल प्रवास ते चेन्नईकडून पदार्पण! शिक्षामित्र असलेल्या बापाच्या लेकाचा IPL प्रवास सुरू, कोण आहे प्रशांत वीर?

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT