KSA Football Competition Sandhyamath Tarun Mandal Wins 
क्रीडा

केएसए चषक : ‘संध्यामठ’चा मंगळवार पेठ क्‍लबवर विजय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना आज १-१ ने बरोबरीत राहिला. तर दुसऱ्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळाने मंगळवार पेठ फुटबॉल क्‍लबला १-० ने पराभूत केले. 

बालगोपाल विरुद्ध फुलेवाडी यांच्यातील सामन्यात चढाया-प्रतिचढाया पाहायला मिळाल्या. बालगोपालकडून वैभव राऊत, रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे यांच्या चढायांना फुलेवाडीच्या बचावफळीने वेळीच रोखले. 

पंधरा मिनिटांच्या सामन्यानंतर बालगोपालने फुलेवाडीच्या गोलक्षेत्रात केलेली चढाई ‘बालगोपाल’च्या पथ्यावर पडली. त्यांच्या खेळाडूने टोलवलेला चेंडू ‘फुलेवाडी’च्या खेळाडूने हाताळला. बालगोपालला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. त्यावर ऋतुराज पाटीलने १८ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. 

या गोलची परतफेड ‘फुलेवाडी’कडून प्रतीक सावंतच्या पासवर राजू दासने ५३ व्या मिनिटाला केली. ‘फुलेवाडी’कडून राजू दास, मिशेल, रोहित मंडलिक, अक्षय मंडलिक, अरबाज पेंढारी यांच्या चढायांना ‘बालगोपाल’च्या खेळाडूंनी दाद दिली नाही. ‘बालगोपाल’च्या खेळाडूंनी शॉर्ट पासचा वापर करत ‘फुलेवाडी’ची बचावफळी भेदण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 

संध्यामठ विरुद्ध मंगळवार पेठ यांच्यातील सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात संध्यामठकडून अभिजित सुतारने ४४ व्या मिनिटाला गोल केला. त्यांच्या अभिजित सुतार, योगेश सरनाईक, अमन मोरे, शिवम पोवार, आशिष पाटीलने चांगल्या चढाया केल्या. मंगळवार पेठेकडून आकाश मायणे, आदर्श पोवार, सौरव जाधव, ऋषिकेश पाटील यांनी एकमेकांना पास देत संध्यामठच्या खेळाडूंना झुलविण्याचा प्रयत्न केला. 

संध्यामठच्या अनुभवी खेळाडूंनी त्यांच्या चढाया वेळीत रोखून खेळ संथ करण्यावर भर दिला. सामन्याच्या अखेरपर्यंत मंगळवार पेठेचे खेळाडू गोल फेडण्याच्या तयारीत होते. ती संधी संध्यामठच्या खेळाडूंनी त्यांना मिळू दिली नाही.  

संबंधित बातम्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT