BWF World Tour
BWF World Tour Sakal
क्रीडा

१७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सेनचे ‘BWF World Tour’ जेतेपद मोसमातील पहिलाच ‘लक्ष्य’भेद

सकाळ डिजिटल टीम

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने या मोसमातील पहिलेच जेतेपद पटकावले. लक्ष्यने १७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘बीडब्ल्यूएफ जागतिक टूर’चे अजिंक्यपद पटकावले. लक्ष्यने कॅनडा ओपन या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीत चीनच्या लि शि फेंग याचे आव्हान २१-१८, २२-२० असे परतवून लावत जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली.

लक्ष्य सेन याला मागील वर्षी नाकाच्या दुखापतीचा सामना करावा लागला. त्यानंतर आठ महिने तो बॅडमिंटनपासून दूर होता. २०२२ मधील चार स्पर्धांमध्ये तो पहिल्या फेरीतच गारद झाला. २०२३ मधील सुरुवातीच्या स्पर्धांमध्येही त्याला सुमार कामगिरीमधून जावे लागले.

याप्रसंगी लक्ष्य म्हणाला, हे वर्ष ऑलिंपिक पात्रता फेरीचे वर्ष आहे, पण आतापर्यंत मला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कॅनडा ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर आत्मविश्‍वास उंचावला आहे, असे तो आवर्जून सांगतो.

अंतिम फेरीत लि शि फेंग याच्याकडून मिळालेल्या कडव्या झुंजीनंतर लक्ष्य म्हणाला, प्रतिस्पर्ध्याविरुद्ध चार लढती जिंकलो होतो, पण कॅनडा ओपनच्या अंतिम फेरीचा सामना वेगळाच होता. दोन्ही खेळाडूंचा खेळ उत्तम दर्जाचा होत होता.

त्यामुळे दोन्ही खेळाडूंना एकामागोमाग एक असे गुण मिळत होते. यामुळे या लढतीत दबाव अधिक होता, असे तो पुढे स्पष्ट करतो. सध्या बॅडमिंटन या खेळामध्ये अव्वल ३० मानांकनांत एकापेक्षा एक असे सरस खेळाडू आहेत. त्यांच्याकडून उत्तम खेळ होत आहे. यामुळे कोर्टवर उतरल्यानंतर एकाच प्रकारच्या तीव्रतेने लढावे लागते. कुणालाही हलके लेखू शकत नाही, असे लक्ष्य आवर्जून नमूद करतो.

प्रशिक्षक बदलले, सरावही बदलला

नाकाच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर चांगला सराव होत होता, पण आजारपणामुळे प्रतिकारशक्ती कमी झाली होती. शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालो होतो. माझ्या क्षमतेच्या १०० टक्के खेळू शकत नव्हतो. ऑल इंग्लंड स्पर्धेसाठी चांगला सराव झाला होता, पण त्यामध्येही अपयशी ठरलो.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर कोरियाचे प्रशिक्षक योंग यु यांच्यासोबतचा करार संपला. त्यानंतर अनुप श्रीधर व डेकलाईन लेईटायो यांच्या मार्गदर्शनात सराव करू लागलो. सरावाची पद्धतही बदलली. विमल कुमार व माझे वडील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे सध्या सर्व काही सुरळित सुरू आहे. ऑलिंपिक पात्रता फेरी होणार असल्यामुळे पुढेही माझ्याकडून चमकदार कामगिरी व्हायला हवी, असे तो विश्‍वासाने म्हणाला.

आशियाई दौऱ्यानंतर कलाटणी

प्रशिक्षक अनुप श्रीधर यांना लक्ष्य सेनच्या खेळाबाबत विचारले असता ते म्हणाले, आशियाई दौऱ्यातील चार स्पर्धांमुळे लक्ष्यच्या खेळात आमूलाग्र बदल दिसून आला, त्यामुळे कलाटणी मिळाली. थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत त्याने प्रवेश केला.

त्याच्या फटक्यांची निवड उत्तम होत आहे, असे कौतुक त्यांनी पुढे केले. दरम्यान, लक्ष्य सेनसह भारताचे इतर खेळाडू बुधवारपासून खेळवण्यात येणार असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत.

ऑलिंपिक पात्रता फेरीला मे महिन्यापासून सुरुवात झाली. पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी पुरेसा वेळ माझ्याकडे आहे; मात्र यामुळे सुटकेचा नि:श्‍वास टाकला असे मी म्हणणार नाही. कॅनडा ओपनच्या जेतेपदामुळे आत्मविश्‍वास कमावला आहे, पण आगामी मोसमात दुखापतींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीन.

लक्ष्य सेन, भारतीय बॅडमिंटनपटू, कॅनडा ओपनचा विजेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Jonty Rhodes : गंभीर 2019 पासूनची परंपरा मोडणार; जॉन्टी रोड्स होणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT