indvseng,latest icc test ranking, r ashwin, Virat Kohli, all rounders rankings chennai 2nd test
indvseng,latest icc test ranking, r ashwin, Virat Kohli, all rounders rankings chennai 2nd test  
क्रीडा

Latest ICC Test Ranking: अष्टपैलूंच्या यादीत अश्विनची मुसंडी; शतकाचा झाला मोठा फायदा

सकाळ ऑनलाईन टीम

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्रमवारीत आघाडीच्या पाच खेळाडूंमध्ये पोहचला आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील अष्टपैलू खेळीचा त्याला मोठा फायदा झाला आहे. अश्विनने चेन्नईतील आपल्या घरच्या मैदानावर 8 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने शतकी खेळीही केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने आघाडीच्या पाच अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. ही आतापर्यंतची त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर कायम आहे.  

भारतीय संघाने चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी विजय नोंदवला होता. बॅटिंग-बॉलिंगच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर त्याला आयसीसी क्रमवारीतही फायदा झालाय. अश्विनच्या नावे 336 गुण आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा  जेसन होल्डर (407) रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. रविंद्र जडेजा  403, इंग्लंडचा बेन स्टोक्स 397) आणि बांग्लादेशचा शाकिब अल हसन 352 गुणांसह पहिल्या चारमध्ये आहेत. या अष्टपैलूनंतर अश्विन पाचव्या स्थानावर आहे. 

indvseng,latest icc test ranking, r ashwin, Virat Kohli, all rounders rankings chennai 2nd test

गोलंदाजांच्या क्रमवारीत 34 वर्षीय अश्विन 804 रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर जसप्रीत बुमराहचा नंबर लागतो. बुमराहला चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पिंक बॉलवर पुन्हा तो भारतीय संघाच्या गोलंदाजाची धूरा सांभाळताना दिसेल. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (908 रेटिंग प्वॉइंट्सह अव्वलस्थानी आहे.  

चेन्नईच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला आणि दुसऱ्या डावात 62 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीच्या खात्यात  838 रेटिंग प्वॉइंट्स असून तो फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा केन विलियमसन (919 रेटिंग प्वॉइंट्स) आघाडीवर आहे. त्याच्यापाठोपाठ स्टीव्ह स्मिथ (891), मार्नस लाबुशेन (878) आणि ज्यो रुट (869) चौथ्या स्थानावर आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT