Leicestershire vs India Warm-up Match Cheteshwar Pujara Rishabh Pant Jasprit Bumrah Prasidh Krishna Play Against Team India  esakal
क्रीडा

IND vs LEIC : बुमरा, पुजारा अन् पंत टीम इंडियाविरूद्धच थोपटणार दंड

अनिरुद्ध संकपाळ

लिसेस्टर : भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ यापूर्वीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. टीम इंडिया आज लिसेस्टरशायर विरूद्ध 4 दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा झाली असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे भारतीय संघातील काही खेळाडू भारताविरूद्धच खेळणार आहेत. (Leicestershire vs India Warm-up Match Cheteshwar Pujara Rishabh Pant Jasprit Bumrah Prasidh Krishna Play Against Team India)

लिसेस्टरशायर विरूद्ध भारत सामना आजपासून सुरू होत आहे. या चार दिवसाच्या सराव सामन्यात भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू लिसेस्टरशायर संघाकडून खेळणार आहेत. म्हणजेच भारतीय संघातील खेळाडूंविरूद्ध हे सर्वजण दंड थोपटणार आहेत. दुसरीकडे भारतीय संघाकडून रोहित शर्मा, श्रीकार भरत, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव खेळणार आहेत.

भारताचे काही खेळाडू लिसेस्टरशायर संघाकडून खेळण्यामागे सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, सराव व्हावा असा उद्येश आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव सामना 1 जुलैपासून सुरू होणार आहे. याचबरोबर या दौऱ्यात भारत 7 जुलैपासून तीन टी 20 आणि तीन वनडे सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारताचा टी 20 संघ आयर्लंड दौरा देखील करणार आहे. या दौऱ्यात 26 जून आणि 28 जूनला भारतीय संघ दोन टी 20 सामने खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT