Lionel Messi
Lionel Messi  Twitter
क्रीडा

'फॅमिली मॅन'! मेस्सीनं ग्राउंडमधूनच केला बायकोला व्हिडिओ कॉल

सुशांत जाधव

फुटबॉलच्या मैदानात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक विजयानंतर 'फॅमिली मॅन'ची झलक दाखवून दिली. देशासाठी मिळवलेल्या पहिल्या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने थेट मैदानातून आपली पत्नी अँटोनेला रोक्कुझो आणि मुलांना व्हिडिओ कॉल केल्याचे पाहायला मिळाले. गत विजेत्या ब्राझीलला 1-0 असे नमवत अर्जेंटिनाने 28 वर्षानंतर कोपा अमेरिका स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरले.

या विजयाने राष्ट्रीय संघाकडून खेळताना मोठ्या स्पर्धेतील अपयशाचा मेस्सीच्या 10 नंबर जर्सीवरचा ठपका आता पुसला गेलाय. घरच्या मैदानावर 2500 दिवसांपेक्षाही अधिक काळ अपराजित राहिलेल्या ब्राझीलला रोखून अर्जेंटिनाने 15 व्या जेतेपदावर नाव करत उरग्वेच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. (Lionel Messi Shares Emotional Winning Moments With Wife On Video Call From Ground After Copa America Win Watch)

विजयानंतर मेस्सी आपल्या कुटुंबियाशी व्हिडिओ कॉलवर आनंद व्यक्त करत असलेला खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. देशाकडून खेळताना मिळवलेले गोल्ड मेडल दाखवत कुटुंबियांसोबत सोनेरी क्षण मेस्सीने शेअर केला. कोपा अमेरिकाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय अँटोनेला हिने या व्हिडिओचा स्क्रीन शॉट इन्टा स्टोरी म्हणून ठेवल्याचे पाहायला मिळते.

30 जून 2017 मध्ये मेस्सीने आपली गर्लफ्रेंड अँटोनेला हिच्यासोबत विवाह थाटला होता. अर्जेंटिना येथील अलिशान हॉटेलमध्ये काही खास मंडळींच्या साक्षीने या दोघांचा विवाह पार पडला होता. मेस्सी आणि अँटोनेला बालपनापासूनच एकमेकांना ओळखतात. 2010 पासून हे स्वीट कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अँटोनेलाने अँटोनेला दोन मुलांना जन्म दिल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केले होते. थिएगो आणि मेतिओ अशी त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप दरम्यान झालेल्या मुलांची नावे आहेत. लग्नानंतर 2018 मध्ये यांना तिसरे अपत्य झाले. त्याचे नाव सीरो असे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT