Long Jumper Murali Sreeshankar Won Gold Medal In International Jumping Meet
Long Jumper Murali Sreeshankar Won Gold Medal In International Jumping Meet esakal
क्रीडा

Murali Sreeshankar : भारताच्या मुरलीची लांब उडीत सुवर्ण कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताच्या मुरली श्रीशंकरने (Murali Sreeshankar) ग्रीसमध्ये झालेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय जंपिंग मीटमध्ये (International Jumping Meet) लांब उडी प्रकारात 8.31 मीटर लांब उडी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या श्रीशंकरने 8.36 मीटर लांब उडी मारत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. दरम्यान, ग्रीसमधील स्पर्धेत स्विडनच्या टोबियास माँटलेरने 8.27 मीटर लांब उडी मारत रौप्य पदकाची कमाई केली. तर फान्सच्या जुलेस पोमेरीने कांस्य पदक पटकावले. पहिले तीन खेळाडूच 8 मीटरपेक्षा जास्त लांब उडी मारू शकले.

श्रीशंकरच्या या सुवर्ण कामगिरीनंतर भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने ट्विट केले की, 'श्रीशंकरने ग्रीसमधील कालिथिया येथे झालेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय जंपिंग मीटमध्ये 8.31 मीटर लांब उडी मारली. ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाऱ्या श्रीशंकरने सरावावेळी 7.88 आणि 7.71 मीटर लांब उडी मारली होती. केरळच्या या अॅथलिटने हंगामातील पहिल्या इंडिया ओपन जंप्स मीटमध्ये 8.14 आणि 8.17 मीटर लांब उडी मारली होती. त्याने कोझिकोडमध्ये झालेल्या फेडरेशन कपमध्ये आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता.'

23 वर्षाच्या मुरली श्रीशंकरने टोकियो ऑलिम्पिकमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. 7.69 मीटर बेस्ट जंपमारत तो संयुक्तरित्या 24 व्या क्रमकांकावर होता. त्याला फायनलमध्ये देखील क्वलिफाय करता आले नव्हते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ग्रीसच्या मिल्टियाडिस टेंटोग्लूने 8.41 मीटर लांब उडी मारत सुवर्ण पदक जिंकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT