KL Rahul Esakal
क्रीडा

लखनऊचं नेमकं काय चुकलं? कॅप्टन राहुलने दिले स्पष्टीकरण

लखनऊच्या संघाला एलिमिनेटर सामन्यात आरसीबीकडून १४ धावांनी पराभव स्विकारावा लागला.

धनश्री ओतारी

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदर्पण केलेला लखनऊचा संघाला एलिमिनेटर सामन्यात आरसीबीकडून १४ धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात लखनऊच्या संघाने अनेक चुका केल्या. या चुकांवर कॅप्टन राहुल आपले मत व्यक्त करत लखनऊचं नेमकं काय चुकलं? हे सांगितलं आहे.

सामन्यानंतर राहुलने माध्यामांशी संवाद साधला. तो म्हणाला, मला वाटते आमच्या पराभवामागचे कारण अगदी स्पष्ट आहे. आम्ही मैदानावर उतरलो खरे, परंतु आम्ही क्षेत्ररक्षणात मार खाल्ला. आमच्या खेळाडूंनी सोपे झेल सोडले. कधीही सामन्यात झेल सुटल्याने मदत मिळत नाही. अशी कबुली राहुलने यावेळी दिली.

तसेच, वास्तवात बेंगलोर संघाने चांगले क्षेत्ररक्षण केले, परंतु आम्ही क्षेत्ररक्षणात कमी पडलो. रजत पाटीदारच्या शतकाने आम्हाला विजयापासून दूर नेले. जेव्हाही वरच्या ३ पैकी एखादा फलंदाज शतक करतो, तेव्हा अधिकतर संघ विजयी होतात. असे तो यावेळी म्हणाला.

आगामी सीझनमध्ये लखनऊ संघ मैदानात दमदार पुनरागमन करेल असा विश्वासही राहुलने यावेळी व्यक्त केला. आम्ही या हंगामातून खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी घेऊ. ही एक नवीन फ्रँचायझी आहे. आम्ही खूप साऱ्या चूका केल्या आहेत आणि प्रत्येक संघाकडून अशा चुका होतात. पण आता आम्हाला आणखी मजबूत होऊन पुनरागमन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा एक युवा संघ आहे, जो त्यांच्या चुकांमधूनच शिकेल. आता आम्ही घरी परत जाऊ, अजून सक्षम खेळाडू बनण्याचा प्रयत्न करू. असा प्रबळ विश्वास राहुलने यावेळी व्यक्त केला.

नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 4 बाद 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊच्या संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावाच करता आल्या. केएल राहुलचा संघ 14 धावा दूर राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT