Maharashtra BJP chief Chandrakant Patil praises test cricket captain jasprit bumrah world record on twitter
Maharashtra BJP chief Chandrakant Patil praises test cricket captain jasprit bumrah world record on twitter 
क्रीडा

चंद्रकांत दादांचं बुमराच्या फटकेबाजीवर ट्विट, कार्यकर्त्यांची मज्जेशीर प्रतिक्रिया

Kiran Mahanavar

सध्या महाराष्ट्रात राजकारणाचा धुरळा उडालाय. गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि ५० आमदार फोडून ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सरकारला भाजपने पाठिंबा दिलाय. त्यांच्या पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आहे. एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे दुय्य्म दर्जाचं पद मिळालं म्हणून पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातंय. राजकारणाचा हा सगळं गोंधळ सुरु असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील मात्र आपल्या क्रिकेट प्रेमात दंग झाले आहेत अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. (Chandrakant Patil praises test cricket captain jasprit bumrah)

एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये बूम बूम बुमराहने असा गोंधळ घातला की एकापाठोपाठ एक विक्रम मोडीत गेला. बुमराहने 84 व्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडला असा मारला की 2007 वर्ल्डकपची आठवण झाली. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सुदा बुमराहचे अभिनंदन केले आहे. दादांच्या या पोस्टवर चाहत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहे. एकजण म्हणत आहे, दादा असेच फटके आम्हाला आता राज्यात हवे आहे. तर दुसरा म्हणतो, तुम्ही सुद्धा राजकारणातले बुमराह आहात, तुमचा यॉर्कर आम्ही कालच्या मीटिंगमध्ये पाहिलाय, ट्विटवर कार्यकर्त्यांच्या मज्जेशीर प्रतिक्रिया येत आहे.(jasprit bumrah world record)

जसप्रीत बुमराह त्याच्या गोलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र त्याने इंग्लंडमध्ये आपल्या बॅटने इतिहास रचला. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्याने 35 धावा केल्या. 1877 पासून म्हणजेच 145 वर्षांच्या कसोटी इतिहासातील हे सर्वात महागडे षटक आहे. स्टुअर्ट ब्रॉडचे हे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले आहे.

बुमराहने ब्रायन लाराचा कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. लाराने 2003 मध्ये पिटरसनच्या एका षटकात 28 धावा केल्या होत्या. 2013 ला जॉर्ज बेलीने जेम्स अँडरसनच्या एका षटकात 28 धावा करत या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर केशव महाराज देखील या यादीत 2020 मध्ये सामील झाला होता. त्याने जो रूटच्या एका षटकात 28 धावा चोपल्या होत्या. विक्रमाच्या यादीवर नजर टाकली तर कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या पहिल्या चार गोलंदाजांमध्ये इंग्लंडचे तीन गोलंदाज आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT