Maharashtra Kesari Shivraj Rakshe  esakal
क्रीडा

Maharashtra Kesari : शिवराज राक्षेनं महेंद्रला दाखवलं अस्मान; पहिल्या दोन मिनिटातच झाला महाराष्ट्र केसरी

अनिरुद्ध संकपाळ

आक्रमक शिवराजनं महेंद्रला चितपट केलं 

शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडवर चांगली पकड मिळवत शिवराजने चितपट केले.

शिवराज विरूद्ध महेंद्र अंतिम लढत सुरू 

पहिल्या फेरीत दोन्ही तुल्यबळ महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांनी एकमेकांना आजमावून पाहिले.

दुसरी फेरी : शिवराज राक्षेची मुसंडी

दुसरी फेरी सुरू होताच शिवराज राक्षेने माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरविरूद्ध आक्रमक डाव खेळण्यास सुरूवात केली. मात्र सदगीरने चॅलेंजवर एक गुण मिळवत खाते उघडले. सदगीर पिछाडी भरून काढण्यासाठी जोर लावत होता. मात्र शिवराज राक्षे त्याला बचावात्मक डावपेच खेळत रोखून धरत होता. शिवराजने शेवटच्या 10 सेकंदात शिवराजने टेक डाऊनचे 2 गुण मिळवत सामना 8 - 1 असा जिंकला.

पहिली फेरी : हर्षवर्धन बचावात्मक स्थितीत

शिवराज राक्षेने डबल केसरीचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षवर्धनला गादी विभागात बॅकफूटला ढकलत पहिल्या फेरीत 6 - 0 अशी आघाडी घेतली.

शिवराजने गुणांचे खाते उघडले

शिवराजने पहिल्या मिनिटातच 1 गुण मिळवत आपले गुणांचे खाते उघडले.

गादी विभाग : हर्षवर्धन सदगीर विरूद्ध शिवराज राक्षे

गादी विभागात हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात लढत होत आहे. हर्षवर्धन सदगीर डबल केसरीसाठी लढतोय.

शेवटच्या मिनिटात विजयी झटापट

सिकंदर आणि महेंद्र यांच्यात एक एक गुणासाठी चढाओढ सुरू असताना शेवटच्या मिनिटाला दोन्ही पैलवानांनी गुण मिळवण्यासाठी चांगलीच झटापाट सुरू केली होती. एकमेकांवर पकड मिळवण्यासाठी दोन्ही कुस्तीपटू झुंजत होते. अखेर महेंद्र गायकवाडने एक गुण घेत कुस्ती जिंकली.

दुसरी फेरी : चार गुणांची कमाई

महेंद्र गायकवाडने 4 गुण मिळवत आघाडी पिछाडी भरून काढत सिकंदर शेखवर 5 - 4 अशी आघाडी घेतली.

सिकंदर शेखने दोन गुण मिळवले. 

महेंद्र गायकवाडने आघाडी घेतल्यानंतर सिकंदरने प्रतीडाव टाकत दोन गुण पटकाले. पहिल्या फेरीत सिकंदर शेख 2 - 1 गुणांनी आघाडी घेतली.

महेंद्र गायकवाडला एक गुण 

सावध पवित्र्यानंतर महेंद्र गायकवाडने तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत एक गुण घेत आघाडी मिळवली.

दोन्ही पैलवान सावध पवित्र्यात

सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी सावध पवित्रा घेतला.

पहिल्यांदा होणार माती विभागाची कुस्ती

माती विभागात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात लढत होत आहे.

महाराष्ट्र केसरी पाहण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती

पुण्यात मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत होत असलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानावर हजर आहेत.

Maharashtra Kesari : पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली.

शिवराज राक्षेने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. त्याला खांद्याची दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तो गतवेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले.

शिवराजला महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आणि 5 लाख रूपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर शिवराजला महिंद्रा थार ही एसयुव्ही देखील पटकावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT