Maharashtra Kesari 2023 
क्रीडा

Maharashtra Kesari: माजी विजेत्या सदगीरला पराभवाचा धक्का! शिवराज राक्षे किताबासाठी लढणार

Kiran Mahanavar

Maharashtra Kesari 2023 Live : पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा आहे. पहिल्या माती विभागाच्या झालेल्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा 6-4 असा पराभव करत महाराष्ट्र केसरीची फायनल गाठली. तर गादी विभागातून शिवराज राक्षेने माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा 8-1 असा पराभव करत फायनल गाठली.

सामन्यात शिवराजने पहिल्या मिनिटातच 1 गुण मिळवत आपले गुणांचे खाते उघडले. शिवराज राक्षेने डबल केसरीचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षवर्धनला गादी विभागात बॅकफूटला ढकलत पहिल्या फेरीत 6-0 अशी आघाडी घेतली.

सामन्यातील दुसरी फेरी सुरू होताच शिवराज राक्षेने माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरविरूद्ध आक्रमक डाव खेळण्यास सुरूवात केली. मात्र सदगीरने चॅलेंजवर एक गुण मिळवत खाते उघडले. सदगीर पिछाडी भरून काढण्यासाठी जोर लावत होता. मात्र शिवराज राक्षे त्याला बचावात्मक डावपेच खेळत रोखून धरत होता. शिवराजने शेवटच्या 10 सेकंदात शिवराजने टेक डाऊनचे 2 गुण मिळवत सामना 8 - 1 असा जिंकला.

महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला रोख 5 लाखांचे बक्षीस, थार गाडी तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. 18 वजन गटातील विजेत्यांना 18 जावा कंपनीच्या गाड्या विजेत्यांना देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

SCROLL FOR NEXT