Malaysia Masters 2023 HS Prannoy esakal
क्रीडा

Malaysia Masters 2023 : चीनला चारली पराभवाची धूळ; प्रणयने मलेशिया मास्टर्स जिंकून रचला इतिहास

अनिरुद्ध संकपाळ

Malaysia Masters 2023 HS Prannoy : भारताच्या एचएस प्रणयने मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. त्याने चीनच्या वेंग हाँग येंगचा तीन गेममध्ये पराभव करत आपली पहिली वहिली BWF वर्ल्ड टूर जिंकली. 30 वर्षाच्या प्रणयने 94 मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थनावर असलेल्या वेंगला 21 - 19, 13 - 21, 21 - 18 अशा तीन गेममध्ये पराभूत केले.

प्रणयने गेल्या वर्षी थॉमस कपमधील भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्वाची भुमिका बजावली होती. मात्र त्याने 2017 मधील अमेरिकन ओपन ग्रापी गोल्डनंतर एकेरीचे टायटल जिंकले नव्हते. केरळचा प्रणय गेल्या वर्षी स्विस ओपनच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. मात्र त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती .

प्रणयने मलेशिया आणि इंडोनेशिया सुपर 1000 स्पर्धेत देखील सेमी फायनल गाठली होती. रविवारी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या प्रणयने चीनच्या 23 वर्षाच्या खेळाडूविरूद्ध दमदार कामगिरी करत विजय मिळवला. या आठवड्यात प्रणयने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या चाऊ टिएन चेन आणि ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंग आणि जपानच्या केंटा निशिमोटाला देखील पराभवाची धूळ चारली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Latest Marathi News Live Update : राजीव गांधी भवन परिसरात संतापजनक प्रकार, चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर पतीचा हल्ला

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

Ricky Ponting: पंजाब किंग्जची भारतातील स्टार्सभोवती धाकटी संघरचना, पाँटिंगचा दमदार प्लॅन!

SCROLL FOR NEXT