Marcus Stoinis Aggressive Batting Australia Defeat Sri Lanka I esakal
क्रीडा

AUS Vs SL : एकदाची ऑस्ट्रेलिया जिंकली! स्टोयनिसने लंकेच्या फिरकीपटूंना चांगलेच चोपले

अनिरुद्ध संकपाळ

Australia Vs Sri Lanka T20 World Cup 2022 : अखेर यजमान ऑस्ट्रेलिया जिंकली. न्यूझीलंडकडून पहिलाच सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने सुपर 12 मधील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचे विजयासाठीचे 158 धावांचे आव्हान 17 व्या षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसने 17 चेंडूत अर्धशतक ठोकत विजय साकार केला. त्याने 18 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. स्टॉयनिसने आपली खेळी 6 षटकार आणि 4 चौकार मारत सजवली. तर कर्णधार अॅरोन फिंचने 42 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली. मॅक्सवेलने 12 चेंडूत 23 धावा चोपून विजयाला हातभार लावला. लंकेकडून तिक्षाणा, करूणारत्ने आणि धनंजय डि सेल्वाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

श्रीलंकेचे विजयासाठी ठेवलेल्या 158 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी सावध सुरूवात केली. मात्र ही भागीदारी 26 धावांपर्यंत पोहचली असताना महीषा तिक्षाणाने डेव्हिड वॉर्नरला 11 धावा) आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. यानंतर मिचेल मार्शही 17 चेंडूत 17 धावा करून माघारी फिरला.

दरम्यान, कर्णधार फिंच सावध फलंदाजी करत होता. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूत 23 धावा करत ऑस्ट्रेलियाची धावगती वाढवली. दरम्यान, करूणारत्नने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 89 अशी केली. मात्र यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसने आपला दांडपट्टा सुरू केला.

त्याने त्याने 15 वे षटक टाकत असणाऱ्या हसरंगाला एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यानंतर 16 व्या षठकात तिक्षाणाला तीन षटाकर मारत 17 चेंडूत आपले अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही त्याने केला. दरम्यान, कर्णधार फिंचने 41 चेंडूत 31 धावांची अँकर इनिंग खेळली. स्टॉयनिसने 18 चेंडूत 59 धावा चोपल्या. त्यात त्याने 6 षटकार आणि 4 चौकार मारले. ऑस्ट्रेलियाने 16.3 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 158 धावा करत सामना 7 विकेट्स राखून जिंकला.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका या सामन्यात तुलनने दुबळा समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेनेही त्यांच्यासमोर विजयासाठी 158 धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेकडून पथुम निसंकाने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर मधल्या फळीतील फलंदाज चरीथ असलंकाने 25 चेंडूत 38 धावांची आक्रमक खेळी करत लंकेला 150 च्या पार पोहचवले. धनंजया डि सेल्वाने 26 तर चमिका करूणारत्नने 7 चेंडूत नाबाद 14 धावांचे योगदान दिले. श्रीलंकनेने 20 षटकात 6 बाद 157 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT