Marnus Labuschagne floors Ben Stokes with short ball in County Championship clash  esakal
क्रीडा

सामना सुरू असताना अचानक पिचवर झोपला Ben Stokes, काय आहे कारण?

क्रिकेट जगतात सध्या आयपीएल स्पर्धेसह काऊंटी चॅम्पियनशिप देखील सुरू आहे.

धनश्री ओतारी

क्रिकेट जगतात सध्या आयपीएल स्पर्धेसह काऊंटी चॅम्पियनशिप देखील सुरू आहे. डरहम आणि ग्लेमोर्गन यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान एक मजेशीर किस्सा घडला. सामना सुरु असतानाच इंग्लंडचा टेस्ट कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) अचानक पिचवर झोपला. आणि त्यानंतर जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेटर मार्नस लाबुशेनच्या बॉऊन्सर स्टोक्सच्या कंबरेखाली लागला. त्यानंतर अचानक तो पिचवर झोपला. मात्र, स्टोक्सला काहीच दुखापत झाली नव्हती. तरीसुद्धा त्याने काही वेळ पिचवर झोपून मैदानातील सहकाऱ्यांची आणि प्रेक्षकांची त्याने फिरकी घेतली. त्यामुळे काही वेळ मैदानातील परिस्थीती गंभीर बनली होती.

थोड्यावेळाने अचानक उभे राहत तो खेळण्यासाठी सज्ज झाला. त्याने केलेल्या या मजेमुळे सर्वजण चिंतते असल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर त्याने तुफानी खेळी केली. त्याने 150 मिनीटांची खेळी खेळत 110 चेंडूवर त्याने 85 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार आणी 2 षटकारांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी बेन स्टोक्सने काऊंटी मॅचमध्ये वूस्टरशायरविरुद्ध जोश बेकरच्या एका ओव्हरमध्ये 34 धावा ठोकून खळबळ उडवून दिली होती. डरहमकडून खेळताना, बेन स्टोक्सने वॉर्सेस्टरशायरविरुद्ध जोश बेकरच्या 6 चेंडूत 34 धावा केल्या, ज्यात 5 षटकार आणि 1 चौकार समावेश होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lashkar-e-Taiba Claim : भारतीय एजंट्सनी पाकिस्तानात घुसून ३० दहशतवादी केले ठार: लष्करच्या हस्तकाचा धक्कादायक दावा

Pune Municipal Corporation: मोठी बातमी! न्यायालयाकडून आयुक्तांची खुर्ची जप्तीचे आदेश; पुणे महापालिकेची धावाधाव, २१ वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्यांचा विजय

Police Name Plate Misuse : 'पोलीस' नावाची लाल पाटी लावणाऱ्या खासगी वाहनांवर थेट कारवाई होणार; राज्यभरात मोहीम राबविण्याचे आदेश

Inspirational Story: माणुसकी अजून जिवंत! २४ तासांत मदतीतून गरीब शेतकऱ्याला मिळाली नवी बैलजोडी, फेसबुक आवाहनाने घडवला चमत्कार..

Harshvardhan Sapkal: ‘ई-२०’ हा मोठा गैरव्यवहार: हर्षवर्धन सपकाळ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा

SCROLL FOR NEXT