milkha singh flying
milkha singh flying  File Photo
क्रीडा

महान युगाचा अंत!

सकाळ डिजिटल टीम

चंडीगड : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय ॲथलिट ही मिल्खा सिंग यांची ओळख. आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके, रोम ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझपदक थोडक्यात हुकलेल्या हा महान धावपटूचे शुक्रवारी रात्री निधन झाले. कोरोना विषाणू संसर्गामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली आणि वेगवान धाव अखेर थांबली.

मिल्खा यांचे पूत्र गोल्फपटू जीव मिल्खा सिंग यांनी आपल्या वडिलांच्या निधनाचे वृत्त दिले. मिल्खा यांच्या पत्नी माजी व्हॉलिबॉलपटू निर्मल कौर यांचे गेल्या रविवारी कोरोनामुळेच निधन झाले होते. त्यांच्या पूत्र जीव यांच्याव्यतिरिक्त तीन मुली डॉ. मोना सिंग, अलीझा ग्रोव्हर, सोनिया सांवालका असा परिवार आहे. मिल्खा यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1928 रोजी आताच्या पाकिस्तानमधील गोबिंदपुरा येथे झाला. फाळणीच्या वेळेस ते भारतात आले.

ऐतिहासिक कारकीर्द

वेगवान धावपटू या नात्याने मिल्खा यांनी भारतीय ॲथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी घडविली. 1958 साली कार्डिफ येथे झालेल्या तत्कालीन ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. 400 मीटर शर्यतीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या माल्कम स्पेन्स याला मागे टाकताना 46.6 सेकंद वेळ नोंदविली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे मिल्खा हे भारताचे पहिले ॲथलीट ठरले. त्यांचा हा विक्रम 50 पेक्षा जास्त वर्षे अबाधित राहिला.

नवी दिल्लीत 2010 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कृष्णा पुनिया हिने थाळी फेकीत सुवर्णपदक जिंकून मिल्खा यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मिल्खा यांनी 1956 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत 200 मीटर व 400 मीटर शर्यतीत सुवर्ण, तसेच 1962 मधील आशियाई स्पर्धेत 400 मीटर व 4 बाय 400 मीटर रिलेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

ऑलिंपिक पदक हुकले

1960 मधील रोम ऑलिंपिक स्पर्धेत मिल्खा याना ब्राँझपदक अगदी निसटते हुकले. फोटो फिनिशमध्ये ते चौथ्या क्रमांकावर राहिले. तेव्हा त्यांनी रोम येथे नोंदविलेला 45.6 सेकंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम 1998 साली परमजीत सिंग याने मोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Marathi News Live Update: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT