Mithali Raj says after she retire Indian side will be far stronger  esakal
क्रीडा

माझ्या निवृत्तीनंतर भारतीय संघ खूप मजबूत असेल : मिताली राज

सकाळ डिजिटल टीम

क्वीन्सटाऊन: भारताने न्यूझीलंड विरूद्धचा (India Womens Cricket Team) पाचवा वनडे सामना जिंकून मालिकेची सांगता केली. भारताने न्यूझीलंडवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. विजयात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) नाबाद 53 धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. सामना संपल्यानंतर मिताली राजने 4 मार्चपासून न्यूझलंडमध्ये सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकप संदर्भात एक वक्तव्य केले. ती म्हणाली की मी ज्यावेळी वर्ल्डकप नंतर निवृत्त होईन त्यावेळी भारतीय संघात नवीन प्रतिभाशाली खेळाडू येतील आणि तो आणखी मजबूत होईल. (Mithali Raj says after she retire Indian side will be far stronger)

मिताली राज म्हणाली, 'मी ज्यावेळी या स्पर्धेनंतर निवृत्त होईन त्यावेळी भारतीय संघ येणाऱ्या नव्या प्रतिभाशाली खेळाडूंमुळे चांगलाच मजबूत होईल.' मिताली पुढे म्हणाते, 'गेल्या काही सामन्यात आम्ही आमचा खेळ उंचावला आहे. वर्ल्डकपपूर्वीचा हा चांगला संकेत आहे. मोठ्या स्पर्धेपूर्वी तुमची चांगली तयारी होणे गरजेचे असते. आम्हाला भारतात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे सराव करायची संधी मिळाली नाही.'

पाचव्या सामन्याबाबत बोलताना मिताली म्हणाली, 'खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. मात्र आज आम्ही चांगली गोलंदाजी केली. मात्र अजून आम्हाला आमच्या फिल्डिंगवर जास्त काम करायला हवे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket Board) दिलेल्या या संधीसाठी त्यांचे आभार.' पाचव्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडचे 251 धावांचे आव्हान 46 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) 71, हरमनप्रीत कौरने 63 तर कर्णधार मिताली राजने नाबाद 53 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT