Mohammad Azharuddin Sakal
क्रीडा

VIDEO : अझरूद्दीन 22 वर्षांनी मैदानात; लेकासोबत तुफान फटकेबाजी

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन (Mohammad Azharuddin) 22 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. मनगटाच्या जोरावर स्टायलिस्ट शैलीत बॅटिंग करणाऱ्या अझरूद्दीन यानी अजूनही आपल्या भात्यात उत्तम फटकेबाजीचा नजराणा असल्याची झलकच दाखवली. अझरूद्दीन यांनी भारताकडून 2000 मध्ये पाकिस्तान विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.

22 वर्षानंतर पुन्हा एकदा अझरूद्दीन यांची खास शैलीतील बॅटिंग प्रेक्षकांनी अनुभवली. युएईच्या मैदानात फ्रेंडशिप कप 2022 (UAE Friendship Cup) स्पर्धेत अझरुद्दीन इंडिया लीजेंड्स ( India Legends) कडून मैदानात उतरला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत अझरुद्धीनचा मुलगा असदुद्दीन (Mohammad Azharuddin son Asaduddin) देखील मैदानात उतरला होता. बॉलिवूड किंग्ज विरुद्धच्या सामन्यात बापलेकांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलीवूड किंग्जने विरुद्धच्या सामन्यात अझरूद्दीनचा मुलगा असदुद्दीन याने 1 चौकार आणि 1 षटकारासह 24 चेंडूत 22 धावा केल्या. अझरुद्दीन याने 28 चेंडूत 31 धावांची खेळी केली. यात त्याने 3 खणखणीत चौकार खेचले. इंडिया लीजेंड्सने पहिल्यांदा बॅटिंग करताना 10 षटकात 2 बाद 83 धावा केल्या होत्या. बॉलिवूड किंग्जच्या संघाला 10 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावांपर्यंत मजल मारता आली.

अझरूद्दीन याने याआधी वर्ल्ड लीजेंड्स विरुद्धच्या सामन्यातही आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली होती. यावेळी त्याने 19 चेंडूत नाबाद 13 धावांची खेळी केली. अझरुद्दीन याने आपल्या बॅटिंगमधून नव्वदीच्या दशकातील आठवणीला उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT