Mohammad Rizwan Khushdil Shah Shine ESAKAL
क्रीडा

PAK vs HK : रिझवानची झुंजार खेळी तर खुशदीलचा तडाखा; हाँगकाँगसमोर 194 धावांचे मोठे आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup Pakistan vs Hong Kong Group A : आशिया कप ग्रप A च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 2 बाद 193 धावा चोपल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर 57 चेंडूत नाबाद 78 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला फखर झमानने 41 चेंडूत 53 धावांची खेळी करून चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हाँगकाँगने पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझमला स्वस्तात माघारी धाडत दमदार सुरूवात केली. एहसान खानने बाबर आझमला 9 धावांवर बाद केले. त्यानंतर सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि फखर झमानने सावध फलंदाजी करत पॉवर प्लेमध्ये 40 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, 10 षटकापर्यंत पाकिस्तानची धावगती 6 च्या आसपास होती.

मात्र त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि फखर झमानने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी रचली. पाकिस्तानच्या 16.1 षटकात 129 धावा झाल्या असताना अर्धशतकी खेळी केलेला फखर झमान (53) बाद झाला. त्यालाही एहसान खाननेच बाद केले.

त्यानंतर मोहम्मद रिझवानने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याला खुशदील शाहने 15 चेंडूत नाबाद 35 धावा चोपून चांगली साथ दिली. खुशदीलने आपल्या 35 धावांमधील 30 धावा या षटकाराने केल्या. रिझावान आणि खुशदीलने तिसऱ्या विकेटसाठी 23 चेंडूत 64 धावांची आतशी भागीदारी रचत पाकिस्तानला 193 धावांपर्यंत पोहचवले. रिझवानने 57 चेंडूत 78 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT