mohammad shami photo with jaguar sports car rishabh pant car accident india vs sri-lanka
mohammad shami photo with jaguar sports car rishabh pant car accident india vs sri-lanka  
क्रीडा

Ind vs SL : शमीचा १ कोटी किमतीच्या कारसोबत फोटो; चाहते म्हणाले, 'भावा जरा…'

सकाळ डिजिटल टीम

टीम इंडिया १० जानेवारी रोजी श्रीलंकेविरोधात वनडे सीरीज खेळणार आहे. या सीरीजचा पहीला सामना गुवाहाटी येथे खेळण्यात येणार आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी देखील या सीरीजदरम्यान पुनरागमन करत आहे. वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमिवर शमीचा फॉर्म महत्वाचा ठरणार आहे. यादरम्यान शमीचा एक फोठो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

शमीने त्याच्या लाल रंगाट्या जग्वार कारसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्याचे फॅन त्याचं कौतुक करत आहेत. शमीने मागील वर्षी जुलै महिन्यात जग्वार कंपनीची एफ-टाइप स्पोर्ट्सकार खरेदी केली होती. शमीचा हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटो पाहून लोकांना ऋषभ पंतची आठवण येत आहे. काही दिवसांपूर्वी पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. त्या पार्श्वभूमिवर लोक शमीला वेगवेगळे सल्ले देत आहेत.

चाहत्यांनी लिहिले की, प्लीज सावकाश चालव. तर काही चाहत्यांनी लिहिले की, ही खूप फास्ट कार आहे, भावा जरा जपून. मोहम्मद शमीला त्याच्या चाहत्यांनी गाडी खूप फास्ट न चालवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्याच्या पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शमीने त्याचा शेवटचा वनडे सामना इंग्लड विरोधात जुलै २०२२ मध्ये खेळला होता, तब्बल ६ महिन्यानंतर तो संघात परत येतो आहे. टीम इंडीया श्रीलंकेविरोधात १० जानेवारी रोजी तीन सामन्याची सीरीज खेळणार आहे. तसेच या वर्षी वनडे वर्ल्डकप देखील होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT