virat kohli google
क्रीडा

पाकचा दिग्गज म्हणतो, मॉडर्न क्रिकेटचा 'किंग' विराटच!

रनमशिन विराट कोहली आणि क्रिकेटच्या मैदानात देवाची उपमा देण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यात तुलना केली जायची.

सुशांत जाधव

पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद युसूफ (Mohammad Yusuf) याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) कौतुक केले आहे. फिटनेस आणि ट्रेनिंग यांच्या सुरेख संगम हे विराटच्या यशामागचे रहस्य आहे, असे मोहम्मद युसूफ यांनी म्हटलंय. युसूफने यू-ट्यूबशोच्या माध्यमातून संवाद साधताना विराटच्या फलंदाजीवर भाष्य केले. कोहलीला ट्रेनिंग करताना पाहिलेलं नाही. पण त्याचे व्हिडिओ पाहिले आहेत. विराट फिटनेस आणि ट्रेनिंगवेळी जी मेहनत घेतो, ते मॉडर्न क्रिकेटचे उत्तम उदाहरण वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे. कोहलीने वनडे आणि टेस्ट मिळून 70 शतके झळकावली आहेत. वनडेतील 12 हजार धावा झळकवणारा विराट कसोटीतही 10 हजारच्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. टी-20 मध्येही तो दमदार करतोय. सध्याच्या घडीला विराट कोहली हा टॉपचा खेळाडू असून त्याची तुलना इतर कोणाशी करणे चुकीचे वाटते, असेही ते म्हणाले. (Virat Kohli todays era No 1 batsman says Pakistan Mohammad Yousuf)

रनमशिन विराट कोहली आणि क्रिकेटच्या मैदानात देवाची उपमा देण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यात तुलना केली जायची. विराट हा मॉडर्न क्रिकेटर असून मागील काळातील कोणत्याही खेळाडूशी त्याची तुलना करणे पटत नाही. तो खूपच वेगळ्या धाडटणीचा फलंदाज आहे, असेही मोहम्मद युसूफ यांनी म्हटले आहे.

सध्याच्या घडीला विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यातही तुलना केली जाते. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वनडे क्रमावारीत अव्वलस्थान पटकावले होते. त्याच्यासंदर्भातही मोहम्मद युसूफ यांनी मत मांडले. बाबर हा तंत्रशुद्ध खेळाडू आहे. तो प्रतिभावंत खेळाडू असून अनेक गोष्टा पटकन शिकून तो आपल्या खेळात सुधारणा करत आहे. वनडेतील अव्वलस्थान, टी-20 क्रिकेटमधील तिसरे स्थान आणि कसोटीत सहाव्या स्थानावर विराजमान होऊन बाबरने आपल्यातील क्षमता दाखवली आहे. तिन्ही प्रकारात तो चांगली कामगिरी करताना दिसतोय. पाकिस्तानमधील युवा खेळाडूंनी बाबरकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असे मोहम्मद युसूफ यांनी म्हटले आहे. मोहम्मद युसूफ यांनी पाकिस्तानकडून 288 वनडे सामन्यात 9720 धावा केल्या होत्या. 90 कसोटीत त्यांच्या खात्यात 7530 धावा जमा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT