Mohammad Rizwan sakal
क्रीडा

Mohammad Rizwan : 'भारताला हरवल्यानंतर सगळं फ्रीमध्ये...' फुकट्या रिझवानने केला खुलासा

रिझवानचा खुलासा भारतावरील विजयानंतर दुकानदार पैसे....

Kiran Mahanavar

Mohammad Rizwan : भारतीय संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवातून सावरत आहे आणि सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तान संघाचा पराभव झाला आणि खेळाडू त्यातून सावरत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. दरम्यान पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने 2021 च्या टी-20 विश्वचषकातील भारताविरुद्धचा विजय नेहमी लक्षात ठेवल्याचे सांगितले आहे.

पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहम्मद रिझवान हा तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाचा खेळाडू आहे. मोहम्मद रिझवानने गेल्या वर्षी सर्व सामन्यांमध्ये मोलाचे योगदान दिले होते. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात दोघांनी मिळून भारताविरुद्ध 152 धावा केल्या होत्या आणि 10 गडी राखून पराभव केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने सात गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या होत्या. यानंतर दोघांनी मिळून केवळ 13 षटकांतच लक्ष्य गाठले.

विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती. या स्पर्धेत भारत ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या विजयानंतर रिझवानसोबत असे काही घडले जे तो नेहमी लक्षात ठेवेल.

मोहम्मद रिजवान एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाला की, 2021ला भारताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर मला वाटले की हा एक सामान्य सामना झाला, कारण आम्ही सहज जिंकलो पण जेव्हा मी पाकिस्तानला परतलो तेव्हा हा विजय किती खास आहे. हे माझ्या लक्षात आले. मी जेव्हा दुकानात जायचो तेव्हा त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. ते म्हणायचे तुमच्याकडून आम्ही कशाला पैसे घेऊ. लोक म्हणायचे इथे तुझ्यासाठी सर्व काही फुकट आहे. त्या सामन्यानंतर आम्हाला पाकिस्तानमध्ये असे प्रेम मिळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT