Mohammed Shami Covid-19 Report Negative sakal
क्रीडा

IND vs SA: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, शमीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने शमीच्या जागी उमेश यादवला संधी दिली आहे

Kiran Mahanavar

Mohammed Shami Covid-19 Report Negative : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेचा भाग होणार नाही. कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता त्यामुळे तो संघाबाहेर गेला होता. पण बुधवारी शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, त्याचा कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. भारतीय संघाने शमीच्या जागी उमेश यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळणार होती, पण कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. बीसीसीआयने बदलीची घोषणा केली आहे, मात्र त्यानंतर काही तासांनंतर शमीची कोविड चाचणी निगेटिव्ह येणे ही निश्चितच संघासाठी दिलासा देणारी बातमी आहे. मात्र शमीला पुन्हा संघात स्थान मिळेल की नाही, हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. संघ व्यवस्थापन प्रश्न निर्माण झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या टी-20 मालिकेसाठी वेगवान गोलंदाज उमेश यादव, फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शाहबाज अहमद यांच्या नावाचा संघात समावेश आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीशिवाय दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या संघाबाहेर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT