MS Dhoni With Fan Sakal
क्रीडा

'भेटी लागे जीवा'...धोनीसाठी पठ्ठ्या 1436 KM पायी रांचीत पोहचला

जोपर्यंत धोनीला भेटणार नाही तोपर्यंत क्रिकेट खेळणार नाही, अशी शपथच या अवलियाने घेतली होती.

सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. धोनीची एक झलक पाहण्यासाठी आजही त्याचे चाहते उत्सुक असतात. धोनीचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी जवळपास 1436 किलोमीटर पायी चालत रांचीमध्ये पोहचला आहे. अजय गिल असे या चाहत्याचे नाव आहे. धोनीच्या प्रेमापोटी त्याने तीन महिन्यात दुसऱ्यांदा ही गोष्ट केलीये.

यापूर्वी ज्यावेळी तो रांचीमध्ये आला होता त्यावेळी धोनी 2021 च्या हंगामातील आयपीएलसाठी युएईमध्ये असल्याच्या त्याला समजले होते. पहिल्यांदा 16 दिवसात पार केलेले अंतर आता अजयने 18 दिवसात पार केले. पण यावेळी त्याची मेहनत वाया गेली नाही. त्याला धोनीला भेटण्याची संधी मिळाली.

माही फक्त त्याला भेटला नाही तर परत घरी जाण्यासाठी त्याने आपल्या चाहत्याला विमानाचे तिकीटही काढून दिले. यापूर्वी धोनीने त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि ऑटोग्राफही दिले. त्याची राहण्याची सोयही धोनीने केली. धोनीची भेट झाल्यामुळे 18 वर्षांच्या या चाहत्याचा आनंद गगनात मावेना झालाय. आयुष्याचे सार्थक झाले, अशी भावना त्याने प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

15 ऑगस्ट रोजी धोनीने अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर या चाहत्याने क्रिकेट खेळणंच बंद केले होते. जोपर्यंत धोनीला भेटणार नाही तोपर्यंत क्रिकेट खेळणार नाही, अशी शपथच या अवलियाने घेतली होती. अजय हा मुळचा हरियाणाचा असून तो भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न बाळगून आहे. हरियाणा ते झारखंड तो पायी चालत आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''भाजप कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा लावणार, कुणाचा बाप..'' अमरावतीमध्ये कार्यकर्त्याचा संताप, व्हिडीओ व्हायरल

Sadanand Date : दहशतवादी कसाबला भिडणारे सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवीन पोलिस महासंचालक!

Latest Marathi News Update : पोलिसांनी देशात सुरू असलेलं किडनी रॅकेट उघडकीस आणलं

Akola Crime : एसीबीच्या जाळ्यात पोलिस ठाण्याचा रायटर; अकोल्यात लाच व्यवहाराचा भांडाफोड!

Ravindra Chavan: महापौर युतीचाच! नाराजीवर संयम, संवाद आणि समजुतीचा मार्ग; रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT