MS Dhoni Police
MS Dhoni Police esakal
क्रीडा

MS Dhoni Police : रांचीच्या सिंघमने वेधले रोहित शेट्टीचे लक्ष; अजय, रणवीरसह अक्षयलाही फोडला घाम

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Police : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सध्या आयपीएल 2023 चे वेध लागले आहेत. त्याने हंगामासाठी सराव सुरू केल्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील मध्यंतरी व्हायरल झाले होते. मात्र आता धोनी अचानक अॅक्टिंगकडे वळल्याच आढळून आले आहे. पोलिसी वेशातील धोनीचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. धोनीचा हा अॅक्शन मोडमधील फोटो पाहून सिंघ फेम दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील अश्चर्यचकीत झाला असेल.

महेंद्रसिंह धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची क्रेझ मात्र कमी झालेली नाही. तो अजूनही आयपीएलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतोय. त्यामुळे त्याच्याकडील जाहिरातींचा देखील ओघ काही अटलेला नाही. तो विविध ब्रँड्सच्या जाहिराती करत आहे. नुकतेच त्याने एका जाहिरातीचे शुटिंग केले असून त्यात तो पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात दिसत आहेत. धोनी तसाही भारतीय लष्करात मानद ल्युटेनंट कोलोनेल पदावर आहेच.

धोनीचा पोलिसी वेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्विटरवर तर चाहत्यांना या फोटोला खूप पसंती दर्शवली. धोनीचा फोटो पाहून सर्वांना रोहित शेट्टीच्या सिंघम, सिंबा चित्रपटाची आठवण झाली. धोनीचा धाकड फोटो पाहून रणवीर सिंह, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम केले आहे. त्या सर्वाना आता महेंद्रसिंह धोनी तगडी टक्कर देतोय.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैरदाबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT