Mukesh Kumar Fail Trice In Army Medical Test Now Selected In Indian Cricket Team
Mukesh Kumar Fail Trice In Army Medical Test Now Selected In Indian Cricket Team  esakal
क्रीडा

Mukesh Kumar : आर्मीचा युनिफॉर्म घालायचं स्वप्न तीन वेळा भंगलं पण आता टीम इंडियाच्या जर्सीत झळकणार

अनिरुद्ध संकपाळ

Mukesh Kumar India Vs South Africa ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका झाल्यानंतर दोन्ही संघ तीन वनडे सामन्यांची मालिका देखील खेळणार आहेत. या मालिकेसाठी नुकतेच भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली. या संघात फलंदाज रजत पाटीदार आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांना संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे हे दोघेही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील अशी शक्यता आहे.

रजत पाटीदार हा आरसीबीकडून खेळला असल्याने त्याबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र मुकेशची कहाणी उजेडात आली नव्हती. भारतीय संघात निवड झालेला मुकेश कुमार हा बिहारच्या गोपालगंजचा राहणारा आहे. त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला असून त्याचे वडील घर चालवण्यासाठी कोलकात्यात रिक्षा चालवायचे. मुकेश सुरूवातीला गोपालगंजमध्ये क्रिकेट खेळत होता. त्यानंतर त्याची निवड बिहारच्या 19 वर्षाखालील संघात झाली. मात्र वडिलांनी त्याला नोकरीसाठी कोलकात्याला बोलावून घेतले. क्रिकेटवेडा असलेल्या मुकेशने कोलकात्यात देखील आपले क्रिकेट सुरूच ठेवले.

दरम्यान, मुकेशने सैन्यात भरती होण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तो तीनवेळा मेडिकल टेस्टमध्ये फेल झाला. त्यानंतर त्याने कोलकात्याकडून क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. तो खर्च निघावा यासाठी प्रायव्हेट क्लबकडून खेळून सामन्याला 500 रूपयाची कमाई करू लागला. त्याने 2014 मध्ये बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सिलेक्शन ट्रायलमध्ये उतरला. कोच रानादेब बोस यांनी त्याची प्रतिभा ओळखली. त्यानंतर त्यांनी मुकेशची इडन गार्डनमध्ये एका खोलीत रहाण्याची सोय केली. त्याने 2015 मध्ये बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

गेल्याचवर्षी मुकेशच्या वडिलांचे झाले निधन

मुकेशचे वडील काशीनाथ सिंह यांचे गेल्याचवर्षी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर मुकेशच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र त्याने हार मानली नाही. मुकेश आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करत राहिला. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी करत भारतीय संघाचे दार ठोठावले. आता टीम इंडियाची दारे त्याच्यासाठी उघडली असून जर त्याने या मालिकेत चांगली कामगिरी केली तर त्याला आयपीएलची दारे देखील लगेच उघडतील.

भावंडात सर्वात लहान मुकेश

मुकेश हा आपल्या सर्व भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. त्याला चार मोठ्या बहिणी आहेत. त्याचे वडील एक ड्रायव्हर होते. मात्र त्यांनी आपल्या तीनही मुलींची लग्ने करून दिलीत. त्यामुळे ते मुकेशला क्रिकेट खेळण्यासाठी जे काही लागतं ते फार काही देऊ शकले नाहीत. मुकेशची मेडिकल टेस्ट झाली त्यावेळी तो फिट नव्हता.

त्यानंतर रानादेबने सौरभ गांगुलीशी बोलून मुकेशला इडन गार्डनमध्ये एक खोली मिळवून दिली. त्याला सर्व सुविधा मिळायला लागल्यानंतर मुकेशने मागे वळून पाहिले नाही. आता तो भारतीय संघाचा भाग झाला आहे. गेल्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर मुकेशच्या चौथ्या बहिणीचे मुकेशने लग्न करून दिले. आता यापेक्षा आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे भारतीय संघात निवड.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ

शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT