Mumbai cricketer dies after ball from another match hits him marath News 
क्रीडा

क्रीडा विश्व हादरलं! क्षेत्ररक्षण करताना मुंबईत क्रिकेटपटूचा मृत्यू; एकाच वेळी सुरू होते दोन सामने

Accident In Cricket Match Mumbai News |

Kiran Mahanavar

Accident In Cricket Match Mumbai : मुंबईतील क्रिकेट मैदानावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. क्रिकेट सामना खेळत असताना एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मैदानावर दोन सामने सुरू असल्याने हा अपघात झाला. आणि दुसऱ्या सामन्यातील चेंडू जयेश सावला नावाच्या व्यक्तीच्या डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सोमवारी दुपारी माटुंगा येथील दादरकर मैदानावर एकाच वेळी दोन सामने सुरू होते. दोन्ही सामने एकाच टी-20 स्पर्धेतील होते. 50 वर्षांवरील लोकांसाठी ही स्पर्धा होती. कुटची विसा ओखल विकास लिजंड कप असे या स्पर्धेचे नाव आहे.

या मैदानावर नेहमीच अनेक सामने एकाच वेळी खेळल्या जातात, त्यामुळे अनेक खेळाडू जखमी होत असल्याच्या बातम्या येत होत्या. अशा अपघातात एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जयेश सावलाला मागून चेंडू लागला आणि तो तिथेच पडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लायन ताराचंद रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, सावला यांना सायंकाळी पाचच्या सुमारास मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारचा कट किंवा घातपात असण्याची शक्यता नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT