esakal
क्रीडा

माजी भारतीय क्रिकेटरच्या वडिलांना अटक, बँक फसवणूकीचा आरोप

भारतीय संघाचा माजी खेळाडू असलेल्या नमन ओझा याच्या वडिलांना बँक फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

धनश्री ओतारी

क्रिकेट जगतातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू असलेल्या नमन ओझा याच्या वडिलांना बँक फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून तो फेटाळण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनय ओझा यांना पोलिसांनी बँक फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या जॉलखेडा शाखेत २०१४ मध्ये झालेल्या जवळपास १.२५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा आहे. पोलिसांनी त्यांच्यावर ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०बी, ३४ आणि आयटी कलम ६५,६६अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

२०१४ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा फरार होते. गेली आठ वर्ष पोलिस त्यांची चौकशी करत होते. २०१३मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जॉलखेडा शाखेत शाखा प्रमुख अभिषेक रत्नम यांनी फसवणुकीची योजना आखली होती. मात्र, त्याची बदली झाल्यानंतर ओझा आणि इतरांनी मिळून जून २०१३मध्ये जवळपास ३४ बनावट खाते उघडून यावर केसीसी कर्ज हस्तांतरित करत जवळपास सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. ज्यावेळी ही हेराफेरी झाली, त्यावेळी ओझा हे शाखा प्रमुख होते.

यानंतर एक वर्षानंतर त्यांच्याविरोधात तत्कालीन शाखा प्रमुख रितेश चतुर्वेदी यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. नावट नावे आणि फोटोंच्या आधारावर शेतकरी क्रेडिट कार्ड बनवून बँकेतून पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. असे तक्रारीमध्ये नोंदवले आहे.

नमन ओझा प्रसिद्ध क्रिकेटपटू

विनय ओझा यांचा मुलगा नमन ओझा हा भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १ कसोटी, १ वनडे आणि २ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने ११३ आयपीएल सामनेही खेळले आहेत.

नमनने कसोटीत ५६ धावा, वनडे सामन्यात १ धाव आणि टी२० मध्ये १२ धावा केल्या आहेत. त्याने ११३ आयपीएल सामन्यात फलंदाजी करताना २०.७२च्या सरासरीने १५५४ धावा चोपल्या आहे. या धावा करताना त्याने ६ अर्धशतकेही चोपली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT