Naomi Osaka lost against Russia Veronika Kudermetova  esakal
क्रीडा

VIDEO: रशियाच्या टेनिसपटूकडून हरलेली ओसाका माईकसमोर का रडली?

अनिरुद्ध संकपाळ

इंडियन्स वेल्स: नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) आतापर्यंत 4 ग्रँडस्लॅम टायटल आपल्या नावावर केली आहेत. मात्र ही चार ग्रँडस्लॅम (Grand Slam) जिंकणारी स्टार खेळाडू बीएनबी परिबास ओपन स्पर्धेत मात्र माईकसमोरच रडली. या स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत ओसाका रशियाच्या (Russia) वेरोनिका कुदेरमेतोवाविरूद्धचा सामना हरली. या सामन्यानंतर प्रेक्षकाच्या अपशब्दामुळे रडू लागली.

नाओमी ओसाका आणि वेरोनिका कुदेरमेतोवा (Veronika Kudermetova) यांच्यातील सामन्यात सुरूवातीला एका महिला प्रेक्षकाने ओसाकाविरूद्ध अपशब्द वापरले होते. याबाबतची तक्रार नाओमी ओसाकाने चेअर अंपायरकडे केली. या महिलेवर कारवाई करण्याची मागणी ओसाकाने केली. मात्र अंपायरने ही व्यक्ती कोण होती हे समजू शकले नाही त्यामुळे त्याच्यावर कारवाई करता येणार नाही असे सांगितले.

या घटनेनंतर नाओमी ओसाका सामन्यात पुनरागमनच करू शकली नाही. तिने रशियन वेरोनिका विरूद्धचा सामना 6-0, 6-4 अशा सरळ सेटमध्ये गमावला. सामना गमावल्यानंतर ओसाका आपले सामन्याबाबतचे म्हणणे मांडण्यासाठी मैदानावरील माईकजवळ आली त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत ओसाका म्हणते की, मी फक्त इतकेच सांगू इच्छिते की, आभारी आहे. मला या ठिकाणी अपशब्दाचा सामना करावा लागला. हा अपमान सेरेना आणि व्हिनस यांनाही सहन करावा लागला होता. मी त्यांचे व्हिडिओ पाहिले आहेत. तुम्ही देखील पाहा. नोआमी ओसाकाने ऑस्ट्रेलियन आणि युएस ओपन दोन दोन वेळा जिंकली आहे. तिला भविष्यातील एक स्टार टेनिसपटू म्हणून ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT