Nasser Hussain Says Team India Played Timid Cricket in ICC Tournaments esakal
क्रीडा

Nasser Hussain : टीम इंडिया घाबरट! नासिर हुसैन यांचे वर्ल्डकपपूर्वीच वादग्रस्त विधान

अनिरुद्ध संकपाळ

Nasser Hussain Timid Cricket Statement : भारताचा टी 20 संघ वर्ल्डकपसाठी सर्वात आधी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेता यावे आणि ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांचा चांगला सराव व्हावा या उद्येशाने टीम इंडिया ऑस्ट्रेलियात लवकर दाखल झाली आहे. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियात कसून सराव करत आहे. मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने टीम इंडियाबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले.

इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैनचे म्हणणे आहे की, भारताकडे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू आहे. हा संघ जवळपास सगळ्या द्विपक्षीय मालिका खिशात टाकत आहे. मात्र सगळ्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघ घाबरटासारखे खेळतो. यामुळेच संघाचे नुकसान होत आहे.

नासिर हुसैन स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'ICC स्पर्धांमध्ये भारत कायम खराब खेळत आला आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. ते मोठ्या स्पर्धेमध्ये घाबटरासारखे खेळतात हेही तितकेच सत्य आहे. मला असं वाटतं की ते कोषात जातात.'

नासिर हुसैन पुढे म्हणाला की, 'टीम इंडियाकडे आक्रमक खेळण्याची क्षमता आहे. सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्मा ज्या दिवशी खेळपट्टीवर टिकला त्यादिवशी तो एकटा सामना जिंकून देऊ शकतो. विराटबद्दल तर सर्व जण जाणताच. संघातून रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह दोन स्टार खेळाडू बाहेर आहेत. अशा परिस्थितीत भारताला ज्या पद्धतीने ते द्विपक्षीय मालिका खेळतात त्याच पद्धतीने वर्ल्डकपमध्ये देखील खेळावे लागले.'

भारताने पहिला वर्ल्डकर 1983 मध्ये जिंकला होता. त्यानंतर भारताला दुसरा वर्ल्डकप जिंकण्यासाठी तब्बल 28 वर्षे लागली होती. भारताने 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. यापूर्वी भारताने 2007 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकला होता. या गोष्टीला आता 15 वर्षे पूर्ण होत आली आहेत. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर हा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT