Nathan Lyon Test Cricket Record esakal
क्रीडा

Nathan Lyon : वॉर्न, मॅग्राला भारतात जे जमलं नाही ते लायननं करून दाखवलं, मुरलीलाही टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

Nathan Lyon Test Cricket Record : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला झुंजारपणा सिद्ध करत जोरदार पुनरागमन केले. या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकत मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या कसोटीत देखील फिरकीला पोषक खेळपट्टी करून आपले WTC फायनलचे तिकीट फायनल करण्याचा भारताचा मनसुबा होता.

मात्र तिसऱ्या कसोटीत कडवट कांगारूंनी भारताचा डाव भारतावरच उलटवला. भारतीय फलंदाजांना कांगारूंच्या फिरकीपटूंनी चांगलेच बेजार केले. पहिल्या डावात भारताला 109 धावात गुंडाळले. तर दुसऱ्या डावात 163 धावात संपूर्ण संघ तंबूत पाठवले. पहिल्या डावात मॅथ्यू कूहमनने पाच तर नॅथन लायनने 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात लायनने कमाल करत तब्बल 8 भारतीय फलंदाजींची शिकार केली.

विशेष म्हणजे नॅथन लायनने दुसऱ्या डावात 64 धावात 8 विकेट्स घेणाऱ्या नॅथन लायनने एक मोठा विक्रम देखील प्रस्थापित केला. लायन हा भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न आणि मॅग्राला देखील असा कारनामा करणं शक्य झालं नव्हतं. मात्र ही कामगिरी नॅथन लायन यांनी केली.

यापूर्वी भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या मुरलीधरनच्या नावावर होता. त्याने भारताविरूद्ध 105 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी नॅथन लायनने 8 विकेट्स घेत मुरलीधरनला मागे टाकले. आता लायनच्या भारताविरूद्धच्या विकेट्सची संख्या ही 112 झाली आहे. लायनने शुभमन गिलची विकेट घेत हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT