Naveen won Gold medal in 74 kg wrestling Beat Pakistan Tahir in Commonwealth Games 2022 esakal
क्रीडा

CWG 2022 : नेव्हीच्या नवीनने पाकच्या कुस्तीपटूला लोळवत जिंकले सुवर्ण

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारताचा कुस्तीपटू नवीनने पाकिस्तानच्या मोहम्मद शाहीर ताहीरला पराभवत करत 74 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले. याचबरोबर भारताने कुस्तीत 6 सुवर्ण पदक पटकावले. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत पहिल्यांदाच 6 सुवर्ण पदक पटकावले. नवीनने 9 - 0 असा एकतर्फी विजय मिळवला.

भारतीय नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या नवीनने पाकिस्तानच्या ताहीरवर पहिल्या फेरीत पायावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र ताहिरने आपला बचाव केला. दरम्यान, नवीन पाकिस्तानच्या ताहीरवर मजबूत पकड बनवली. त्याने पहिल्या फेरीत 2 गुण पटकावले.

त्यानंतर दुसऱ्या फेरीत तांत्रिक दोन गुण पटाकवले आणि त्यानंतर त्याने भारंदाज डाव टाकत 9 गुणांची कमाई केली. नवीन सामना संपेपर्यंत 9 - 0 असा आघाडीवर राहिला. पाकिस्तानच्या मोहम्मद ताहिरला फायनलमध्ये एकही गुण मिळवणे शक्य झाले नाही. नवीनने तांत्रिक सरसतेवर सामना जिंकला.

याचबरोबर, भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) श्रीलंकेच्या चमोदियाचा 4 - 0 असे पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले. विनेशने या सुवर्ण पदकासह राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले सलग तिसरे सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले.

भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने पुरूष 57 किलो वजनी फ्रीस्टाईल गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याने नायजेरियाच्या एबिकेनेनिमो वेल्सनचा 10 - 0 असा पराभव केला. रवी कुमार दहियाची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा होती त्याने पहिल्याच स्पर्धेत फायनल पर्यंत धडक मारली होती.

भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलँडच्या ख्रिस्टलेचा 12 - 2 असा पराभव करत महिला 50 किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले. कुस्तीमधून भारताला मिळालेले हे दुसरे कांस्य पदक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT