esakal
esakal
क्रीडा

अझरुद्दीनने शिवी दिली आणि सिद्धू इंग्लंड दौरा निम्म्यात टाकून परत आला

धनश्री ओतारी

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court on Navjot Singh Sidhu) मोठा झटका बसला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धूच्या या घटनेनंतर त्याचे अनेक जुने वाद समोर येऊ लागले आहेत.

सिद्धूंची ही बंडखोर शैली पहिल्यांदाच समोर आलीय असं नाही. क्रिकेट राजकारण ते टीव्हिच्या स्क्रिनवर सिद्धी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात दिसला आहे. राजकारणी सिद्धूची क्रिकेट जगतातली वादाची किस्से अनेक आहेत. सिद्धून भर मैदानात बंड पुकारले होते. त्याने अर्धवट दौरा सोडत मायदेशी परतला होता.

ही घटना 1996 मधील आहे. तेव्हा टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे होते. मोहम्मद अझरुद्धीन टीम इंडियाचे नेतृत्व करत होता. तर इंग्लंड संघाची कमान मायकल एथरटनकडे होती. या दौऱ्यात सिद्धूला ओपनर म्हणून खेळवण्यात येणार होतं.

पहिला कसोट सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये सिद्धू 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. पण या सामन्यानंतर सिद्धू कोणालाही काहीही न बोलता इंग्लंडहून थेट भारतात परतला. मात्र, सिद्धू तडकाफडकी का गेला हे कोणालाच कळलं नाही. त्यावेळी बीसीसीआयने या प्रकरणाची समिती स्थापन करत चौकशी केली. त्यामध्ये कर्णधार मोहम्मद अझरुद्धीनने सर्वांसमोर अपशब्द वापरला असल्याने सिद्धू तीव्र नाराज झाला होता. त्यामुळे तो मायदेशी परतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT