Neeraj Chopra Wrestler Protest  esakal
क्रीडा

Neeraj Chopra Wrestler Protest : हे वेगळ्या पद्धतीनं... नीरज चोप्राने कुस्तीपटूंसाठी केले ट्विट

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra Wrestler Protest : दिल्लीत आज (दि. 28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. देशीची संसद ही लोकशाहीचे एक प्रतिक मानले जाते. इथूनच लोकांचे लोकांसाठीचे राज्य चालवले जाते. मात्र या संसद भवनापासून काहीच अंतरावर न्यायाची मागणी करत आंदोलनाला बसलेल्या भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना पोलीस फरफटत, ओढत होते. ही दृष्य पाहिल्यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने ट्विट केले.

नीरज चोप्राने पोलिसांच्या बळजबरीचा व्हिडिओ शेअर करत मला हे पाहून खूप दुःख झाले असे ट्विट केले. त्याने या गोष्टी वेगळ्या आणि अजून चांगल्या पद्धतीने हाताळता आल्या असत्या अशी प्रतिक्रिया देखील दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार कुस्तीपटूंनी सुरक्षेसंदर्भातील नियम मोडल्याचे सांगण्यात आले. त्यांनी नवीन संसद भवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तेथे त्या महिलांची महापंचायत भरवणार होत्या. कुस्तीपटूंना फरफटत नेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र ममता बॅनर्जी यांनी देखील ट्विट केले. त्या म्हणाल्या की, 'दिल्ली पोलिसांनी ज्या प्रकारे साक्षी मलिक आणि विनेश फोगाटला धक्काबुक्की केली त्याचा तीव्र शब्दात निषेध. आपल्या चॅम्पियन्सना अशी वागणूक मिळते हे लाजीरवाणे आहे.'

याचबरोबर खेळाडू श्रीशंकर मुरली याने देखील ट्विटरवरून चिंता व्यक्त केली आहे. 'अत्यंत क्रूर! आपले चॅम्पियन्ससोबत असं होऊ नये. एका खेळाडूचे स्वप्न हे ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करण्याचे असते. या फोटोंमुळे खूप खोलवर जखम झाली आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT