Neeraj Chopra World Athletics Championship Javelin Throw
Neeraj Chopra World Athletics Championship Javelin Throw esakal
क्रीडा

World Athletics Championships : Neeraj Chopra ची ऐतिहासिक कामगिरी; 19 वर्षानंतर भारताने जिंकले पदक

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra : नीरज चोप्राने World Athletics Championship मध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. त्याने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. त्याने भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षाचा पदकांचा दुष्काळ संपवला. यापूर्वी लांब उडीज अंजू बॉबी जॉर्जने पदक जिंकले होते. याचबरोबर नीरज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला आहे. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकमध्ये ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्ण पदक पटकावले. त्याने 90.54 मीटर भाला फेकला. चेक रिपब्लिकच्या जेकब वाड्लेचने 88.09 मीटर भालाफेक करत कांस्य पदक पटकावले.

विशेष म्हणजे नीरज चोप्राचे हे जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. यापूर्वी त्याने 2016 मध्ये ज्यूनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर नीरजची ही दुसरी सर्वात चांगली कामगिरी आहे.

नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीची सुरूवात केली. मात्र त्याने पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. दुसरीकडे सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आणि गतविजेता अँडरसन पेटर्सने (Anderson Peters) आपल्या पहिल्याच प्रयत्नात 90.21 मीटर भालाफेक करत नीरज चोप्रासमोर मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर नीरजने 82.39 मीटर भाला फेकला. तो यादीत चौथ्या स्थानावर पोहचला.

मात्र ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकासाठी नीरज समोर अजून मोठे आव्हान ठेवले. पाचव्या स्थानावर घसरलेल्या नीरज चोप्राने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकून आपली कामगिरी सुधारली. तो तिसऱ्या प्रयत्नानंतर तो पुन्हा चौथ्या क्रमांकावर आला.

दुसरीकडे भारताचा दुसरा भालाफेकपटू रोहित यादवने पहिल्या प्रयत्नात 78.5 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 77.96 तर तिसऱ्या प्रयत्नात 78.5 मीटर भाला फेक करून आठव्या स्थानावर होता. तर नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर भालाफेक करत पदकांच्या शर्यतीत आपली दावेदारी रौप्य पदकावर सांगितली. मात्र 90 मीटर मार्क पार करण्याच्या नीरजच्या प्रयत्नाला पाचव्या फेरीत मोठा धक्का लागला. त्याचा पाचवा प्रयत्न अवैध ठरला. त्यामुळे आता त्याच्याकडे फक्त 6 वा आणि शेवटचा प्रयत्न शिल्लक होता.

भारताचा दुसरा भालाफेकपटू रोहित यावद 78.72 मीटर भालाफेक करत यादीत 10 व्या स्थानावर पोहचला. त्यामुळे त्याला पहिल्या टॉप आठ जणांच्या यादीत स्थान मिळवता आले नाही. तो अंतिम फेरीतून बाहेर पडला.

यापूर्वी, नीरज चोप्रा 88.39 मीटर भाला फेकून पहिल्या प्रयत्नातच फायनलसाठी पात्र झाला होता. चोप्रा फायनलच्या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर होता. त्याची राष्ट्रीय विक्रमाबरोबर वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ही 89.94 मीटर इतकी आहे. त्याने याच वर्षी 30 जूनला स्विडन येथे झालेल्या स्टॉकहोम डायमंड लीग 2022 मध्ये आपले 89.30 मीटर भालाफेकीचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता.
याचबरोबर पुरूष भालाफेक पात्रता फेरीत अजून एका भारतीय खेळाडूने चमकदार कामगिरी केली. नीरज चोप्रा पाठोपाठ रोहित यादवने (Rohit Yadav) देखील भालाफेकीची अंतिम फेरी गाठली होती. रोहित 80.42 मीटर भाला फेक करत अंतिम फेरीसाठी पात्र होणाऱ्यांच्या 12 जणांच्या यादीत 11 व्या स्थान पटकावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT