Hockey 5s World Cup, IND vs NED esakal
क्रीडा

Hockey 5s World Cup, IND vs NED : नेदरलँड्सने जिंकला पहिला हॉकी 5s वर्ल्डकप; भारतीय महिला संघाचा केला 7 -2 ने पराभव

Hockey 5s World Cup, IND vs NED : भारतीय महिला संघाचे पहिले विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले

अनिरुद्ध संकपाळ

Hockey 5s World Cup, IND vs NED : ओमानची राजधानी मस्कत येथे झालेल्या पहिल्या महिला हॉकी 5s वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सने भारतीय महिला हॉकी संघाचा 7-2 असा पराभव केला. कसलेल्या नेदरलँड्स संघाने भारताचा प्रत्येक चाल निष्प्रभ ठरवली. नेदरलँड्स या फॉरमॅटचा पहिला विजेता ठरला. एफआयएचने पहिल्यांदाच या फॉरमॅटमध्ये वर्ल्डकपचे आयोजन केले होते.

नेदरलँड्सने पहिल्याच हाफमध्ये केला धमाका

सामन्याबद्दल बोलायचं झाल तर नेदरलँड्सने पहिल्या हाफमध्ये सामन्यावर आपली पकड निर्माण केली. तिसऱ्या मिनिटालाच नेदरलँड्सने पहिला गोल केला. त्यानंतर दोन मिनिटात ही लीड 2 - 0 अशी केली. त्यानंतर पहिला हाफ संपण्यापूर्वी सात मिनिटं आधी तिसरा गोल केला.

भारताच्या बचाव फळीवर प्रचंड दबाव आला होता. त्यांच्याकडे नेदरलँड्सच्या आक्रमण रोखण्याचा कोणताही उपाय नव्हता. भारतीय खेळाडूंनी काऊंटर अटॅक केला मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आलं.

उत्तरार्धात भारतीय संघ चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. त्यांचा बचाव अधिक चांगला दिसत होता. भारतासाठी ज्योती छत्रीने पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. त्याचा गरुड रुतुजाने अप्रतिम रिव्हर्स शॉट मारत संघासाठी दुसरा गोल केला. यानंतर उत्तरार्धाच्या शेवटच्या मिनिटाला रुतुजाने दुसरा गोल केला पण रेफ्रींनी तो गोल घोषित केला नाही. अंतिम हूटरसह नेदरलँड्सनेही भारताचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT