Mohammed Siraj
Mohammed Siraj E Sakal
क्रीडा

पोलिसांचा पहारा अन् व्हिडिओ कॉलवरुन सांत्वन; सिराजची 'अनटोल्ड स्टोरी'

सुशांत जाधव

भारतीय संघाचा नवोदित तार मोहम्मद सिराजची कामगिरी दिवसेंदिवस अधिक चमकदार होताना दिसते. अल्पावधित यशाच्या शिखरावर पोहचलेल्या प्रतिभावंत खेळाडूचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात 8 विकेट घेत सिराजने आपल्यातील क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. ऑस्ट्रेलियात केलेली कामगिरी योगायोगाने झाली नव्हती तर ती कठोर परिश्रमानंतर दिसलेली झलक होती, हेच क्रिकेटच्या पंढरीतील कामगिरीने त्याने दाखवून दिले. ‘Mission Domination: An Unfinished Quest’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्याच्या यशाची आणि त्यामागे दडलेल्या संघर्षाच्या कहाणीचा खुलासा झालाय. बोरिया मजूमदार आणि कुशान सरकार यांनी लिहिलेले हे पुस्तक सायमन अँड शुस्टर पब्लिकेशनने नुकतेच प्रकाशित केले आहे.

आयपीएलमधील युएईच्या मैदानातूनच भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. यावेळी आजारी वडिलांचे निधन झाल्यानंतरही देशासाठी खेळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिराजने घेतल्याची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. आता नव्या पुस्तकातून त्या काळात सिराजवर बेतलेल्या प्रसंगाचा खुलासा समोर आलाय.

पुस्तकातील माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 14 दिवसांच्या सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये असताना सिराजला वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. याचा अर्थ स्पष्ट होता की दुख:चा डोंगर कोसळल्यावर धीर द्यायला त्याच्याजवळ कोणीच नव्हते. त्यावेळी सर्व खेळाडूंच्या रुमसमोर पोलिस बंदोबस्त होता. कोणीही नियमाले उल्लंघन करु नये यासाठी कडेकोट पाहरा टीम इंडियाचे खेळाडू असलेल्या हॉटेलात ठेवण्यात आला होता.

एकटे पडलेल्या आणि वडिलांच्या निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसरळलेल्या सिराजशी त्याचे सहकारी या काळात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते. त्याने स्वत:ला नुकसान करुन घेऊ नये, यासाठी त्याच्या संपर्कात राहण्याचा व्हिडिओ कॉल हे ऐकमेव माध्यम होते. या परिस्थितीत केवळ फिजिओ नितिन पटेल यांनी उपचारासाठी त्याला भेट दिली. एवढेच सात्वंन या काळात प्रत्यक्षात त्याला मिळाले. वडिलांच्या निधनामुळे सिराज पूर्ण खचला होता. ते स्वाभाविकच होते. पण यातून सावरुन त्याने वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले, असा उल्लेख या पुस्तकात सिराजसंदर्भात करण्यात आलाय. देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी तो नुसता मैदानात उतरला नाही. तर या दौऱ्यात त्याने सर्वाधिक विकेट मिळवत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : चांगल्या सुरुवातीनंतर राहुल त्रिपाठी बाद, पण अभिषेक शर्मानं झळकावलं अर्धशतक; हैदराबादच्या 100 धावा पार

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT