India Knocked out of Hockey World Cup 2022 
क्रीडा

IND vs NZ: टीम इंडियासाठी न्यूझीलंड बनली डोकेदुखी! आधी क्रिकेट मग हॉकीत तोडते भारताचे हृदय

हॉकीप्रमाणेच न्यूझीलंडने क्रिकेटमध्येही भारताचे स्वप्न भंगले

Kiran Mahanavar

India Knocked out of Hockey World Cup 2022 : रविवारी क्रॉसओव्हर मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-5 ने पराभूत झाल्याने भारत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये सडन डेथ दरम्यान समशेर सिंगचा गोल चुकला आणि भारतीय क्रीडा चाहत्यांना 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपची आठवण झाली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत होऊन बाहेर पडला. एवढेच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्येही असेच घडले.

बाद फेरीत न्यूझीलंडनी भारताला पुन्हा एकदा हरवले

यावेळी खेळ वेगळा, संघ वेगळे, पण निकाल एकच आला. न्यूझीलंडनी नॉकआऊट सामन्यात पुन्हा एकदा भारताचा पराभव करत तब्बल 47 वर्षांनंतर विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. भारताने आतापर्यंत 1975 मध्ये फक्त एकदाच हॉकी विश्वचषक जिंकला आहे. 2021 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाने चमकदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकले. अशा स्थितीत संघ यंदा दुष्काळ संपवेल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही.

भारतीय संघ हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यासह 1975 नंतर पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्नही भंगले आहे. क्रॉसओव्हर मॅचमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. निर्धारित 60 मिनिटांपर्यंत सामना 3-3 असा बरोबरीत होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 असा विजय मिळवला. टीम इंडियाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि क्रिशन पाठक यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये एकूण चार सेव्ह केले. असे असूनही भारताला विजय मिळवता आला नाही.

क्रिकेटमधील स्वप्नही तुटले

हॉकीप्रमाणेच न्यूझीलंडने क्रिकेटमध्येही भारताचे स्वप्न भंगले आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया दमदार खेळ दाखवत होती. पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पराभव झाला होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सर्वांना आठवला. धोनीला मार्टिन गप्टिलने धावबाद केले आणि भारत विश्वचषकातून बाहेर पडला.

त्यानंतर न्यूझीलंड संघाला 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला. यानंतर 2021 च्या टी-20 विश्वचषकातही त्याने भारताचा पराभव केला. हा सामनाही भारतासाठी करा किंवा मरो अशी स्थिती होती. तिन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prateek Yadav PM Report : मुलायसिंग यांचा मुलगा प्रतिक यादववर विषप्रयोगाचा संशय? पोस्ट मार्टम रिपोर्ट आला; फुफ्फुसांचे काम अचानक बंद

Chhatrapati Sambhajinagar: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश; हाती आले २ हजार, खर्च मात्र २९००; संतप्त होऊन भरउन्हात रस्त्यावर फेकले कांदे

Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! मात्र या IT शेअर्सला मोठा धक्का

Virat Kohli Century : '... तरी मला फक्त बॅटिंगच आवडते', सामनावीर पुरस्कार जिंकत रोहितची बरोबरी केल्यानंतर काय म्हणाला विराट?

Latest Marathi News Live Update : पुण्यात सुखसागरनगरमधील जुन्या गोदामाला लागली आग!

SCROLL FOR NEXT