New Zealand Tour Pakistan esakal
क्रीडा

न्यूझीलंड वर्षात दोन वेळा करणार पाकिस्तान दौरा

सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा अर्धवट सोडणाऱ्या न्यूझीलंडने पाकला दिला बोनस

अनिरुद्ध संकपाळ

लाहोर : काही महिन्यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा अर्धवट सोडणाऱ्या न्यूझीलंड (New Zealand Cricket) 2022 - 23 या वर्षात तब्बल दोन वेळा पाकिस्तान दौरा (New Zealand Tour Pakistan) करणार असल्याची घोषणा केली. न्यूझीलंड आता डिसेंबर / जानेवारी 2022 - 23 मध्ये पाकिस्तान दौरा करणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. तर 2023 च्या एप्रिलमध्ये न्यूझीलंड पुन्हा पाकिस्तान दौरा (Pakistan Cricket Board) करणार आहे. यावेळी ते सप्टेंबर 2021 मध्ये सोडलेला दौरा पूर्ण करतील. यात पांढऱ्या चेंडूवरील 10 सामने खेळले जाण्याची शक्यता आहे. ही घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चेअरमन रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मार्टिन स्नेडेन (Martin Snedden) यांच्याशी चर्चा केल्यानंतर याची घोषणा केली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्याची एकदिवसीय मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेचा भाग असतील. तर एप्रिलमधील दौऱ्यावरील पाच एकदिवसीय सामने आणि पाच टी 20 सामने हे आयसीसी रँकिंगसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. (New Zealand Tour Pakistan)

दरम्यान, यापर्श्वभूमीवर पीसीबीचे (PCB) चेअरमन रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, 'मार्टिन स्नेडेन (Martin Snedden) यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबाबत मी समाधानी आहे. मी मार्टिन स्नोडेन आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे आभार मानतो. यामुळे पाकिस्तान क्रिकेट जगतातील एक महत्वपूर्ण सदस्य आहे हे अधोरेखित होते. यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डातील नाते ऐतिहासिक आणि अधिक घट्ट झाले आहे.'

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी सांगितले की, 'दोन्ही बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा आणि मार्टिन स्नेडेन यांच्यातील दुबईमध्ये झालेली चर्चा फलदायी ठरली. यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डामधील बंध अजूनच घट्ट झाला आहे.'

रमीझ राजा यांच्या घोषणेनंतर आता पाकिस्तान मार्च 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत ऑस्ट्रेलिया (Australia), इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड विरुद्ध 8 कसोटी 11 एकदिवसीय आणि 13 टी 20 सामने मायदेशात आयोजित करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT