WTC Final INDvsNZ esakal
क्रीडा

WTC Final: न्यूझीलंडचे अंतिम १५ खेळाडू ठरले; पटेललाही संधी

नामदेव कुंभार

IND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 18 जून ते 22 जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागलं आहे. संयमी केन विल्यमसनसमोर आक्रमक विराट कोहलीचं आव्हान असणार आहे. या महाअंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडनं केन विल्यामसनच्या नेतृत्वाखाली आपल्या 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायला आलेल्या 20 खेळाडूंच्या संघातील डग ब्रेसवेल, जेकब डफी, डेरिल मिशेल, रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर यांना अंतिम अंतिम 15 मध्ये स्थान दिलेलं नाही. न्यूझीलंडने संघानं कॉलिन डी ग्रँडहोम अष्टपैलू म्हणून तर विल यंग हा फलंदाज कव्हर म्हणून जबाबदारी दिली आहे. न्यूझीलंडच्या निवड समितीनं अनुभवी फिरकीपटू मिचेल सँटनरऐवजी इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटीत चार विकेट घेणाऱ्या एजाज पटेलला संघात स्थान दिलं आहे.

न्यूझीलंडचा संघ -

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लँडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

भारताचा संघ -

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकॅप्टन), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, के.एल. राहुल, वृद्धिमान साहा.

WTC साठी वेगवान खेळपट्टी

साऊदम्पटन येथे होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्यात उसळत्या चेंडूंसाठी पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार आहे, असे खेळपट्टी विशेषज्ञ सिमॉन ली यांनी सांगितलं आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच पोषक असतात. WTC च्या फायनल सामन्यासाठीही अशीच खेळपट्टी तयार करण्यात येणार आहे. पहिले दोन दिवस या खेळपट्टीवर प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहू शकेल, असं ली म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT