New Zealand squad for WTC final  twitter
क्रीडा

टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडकडे भारतीय अस्त्र; संघ ठरला

न्यूझीलंडच्या संघाला त्याच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागले. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार की नाही? असा प्रश्नही निर्माण झाला होता.

सुशांत जाधव

World Test Championship Final : टीम इंडिया विरुद्धच्या मेगा फायनलसाठी न्यूझीलंडचा संघ केन विल्यमसनच्या (Kane Williamson ) नेतृत्वाखालीच मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात केन विल्यमसनला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याने माघार घेतल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या संघाला त्याच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागले. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार की नाही? असा प्रश्नही निर्माण झाला होता.

तो फिट असून न्यूझीलंडचा संघ त्याच्या नेतृत्वाखालीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी मैदानात उतरणार असल्याचे न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी स्पष्ट केले आहे. न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांनी मंगळवारी टीम इंडियाविरुद्धच्या मेगा टेस्ट फायनलसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. (New Zealand squad for WTC final Williamson available to lead against India says Stead)

केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 8 विकेट्सनी पराभूत करत दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली होती. या सामन्यात नियमित कर्णधारासह विकेट किपर आणि फलंदाज बीजे वॉटलिंग यानेही पाठिच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याचेही नाव 15 सदस्यीय संघामध्ये आहे.

केन विल्यमसन आणि बीजे वॉटलिंग टीम इंडिया विरुद्धच्या फायनलसाठी उपस्थितीत असतील, असे गॅरी स्टेड यांनी सांगितले. टीम इंडिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी न्यूझीलंडचा संघ साउथहॅम्प्टनमध्ये पोहचला आहे. याठिकाणी पोहचताच फायनलसाठी कोणते खेळाडू संघात असतील, याची माहिती प्रशिक्षकांनी दिली.

टीम इंडियाविरुद्धच्या फायनलसाठी न्यूझीलंडने 15 सदस्यीय संघात भारतीय वंशाच्या 32 वर्षीय फिरकीपटू अजाझ पटेललाही स्थान दिले आहे. याशिवाय कॉलिन डी ग्रँडहोमेला अष्टपैलूच्या रुपात संघात स्थान मिळाले आहे. टॉम ब्लंडेलचा बॅक विकेट किपरच्या रुपात संघात दिसेल.

New Zealand Squad: केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉन्वे, कॉलीन डी ग्रँडहोमे, मॅट हॅन्री, कायले जेमीनसन, अजाझ पटेल, हेन्री निकोलस, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग आणि विल यंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT