Nicholas Pooran India Vs West Indies 2nd T20I esakal
क्रीडा

Nicholas Pooran : चहलने खेचून आणलेला विजय हुसैनने हिरावून घेतला; भारताचा मालिकेतील सलग दुसरा पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Nicholas Pooran India Vs West Indies 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात देखील भारताला पराभवाचीच चव चाखावी लागली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने विंडीजसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान विंडीजने 2 विकेट्स राखूनच पार केले.

फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भारताला पराभावाच्या दाढेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र निकोलस पूरनची 67 धावांची खेळी अकील हुसैन (नाबाद 14 धावा) आणि अल्झारी जोसेफ (नाबाद 10 धावा) यांनी वाया जाऊ दिली नाही. भारताकडून कर्णधार हार्दिक पांड्याने 3 तर युझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या. (Nicholas Pooran Half Century)

विंडीजची अवस्था 2 बाद 2 धावा अशी झाली असताना निकोलस पूरनने विंडीजचा डाव नुसताच सावरला नाही तरी त्याने पॉवर प्लेमध्येच भारताच्या तोंडून विजयी घास हिसकावून घेण्यास सुरूवात केली.

अनुभवी निकोलस पूरनने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने पॉवर प्लेमध्ये ठरवून आक्रमक फटकेबाजी करत भारताच्या हातून सामना दूर नेला. त्याने 29 चेंडूतच अर्धशतक ठोकले. त्याला इतर फलंदाजांनी 15 - 20 धावा करत चांगली साथ दिली.

सलामीवीर कायल मेयर्सने 15 धावांचे योगदान दिले तर रोव्हमन पॉवेलने 19 चेंडूत 21 धावा केल्या. दुसऱ्या बाजून निकोलस पूरन आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने पॉवेलसोबत 57 धावांची भागीदारी रचली.

पॉवेल 21 धावा करून बाद झाल्यानंतर पूरनने हेटमायर सोबत पाचव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी रचत विंडीजला विजयाच्या जवळ पोहचवले होते. मात्र 40 चेंडूत 67 धावा करणाऱ्या निकोलस पूरनला मुकेश कुमारने बाद करत भारताला मोठा दिलासा दिला.

यानंतर युझवेंद्र चहलच्या 16 व्या षटकात विंडीजने तीन फलंदाज गमावले. रोमारियो शेफर्ड शुन्यावर धावबाद झाला. त्यानंतर जेसन होल्डर देखील शुन्यावर स्टम्पिंग झाला. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहलने शिमरॉन हेटमायरला 22 धावांवर बाद करत विंडीजला मोठा धक्का दिला.

विंडीजची अवस्था 4 बाद 126 वरून 8 बाद 129 धावा अशी झाली. मात्र अकिल हुसैन आणि अल्झारी जोसेफ यांनी विंडीजला पराभवापासून वाचवले. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी रचली. हुसैनने 14 तर जोसेफने नाबाद 10 धावा करत दोन विकेट्स अन् एक षटक राखून विजय मिळवून दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hong Kong fire: हाँगकाँगमधील मृतांची संख्या ९४वर; शेकडो सदनिका जळून खाक, अजूनही आग आटोक्यात नाही

फक्त सुरजच नाही, प्रेक्षकांच्या लाडक्या येसुबाईंच्याही लग्नाआधीच्या विधींना सुरुवात; थाटात पार पडला घाणा अन् बांगड्या भरण्याचा कार्यक्रम

Cyclone Dithwa : श्रीलंकेत हाहाकार माजवल्यानंतर आता 'दित्वा' चक्रीवादळाने भारताकडे वळवला मोर्चा!

Sarathi Scheme : सारथी’च्या दुर्लक्षामुळे डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती अडचणीत; ७० हजार विद्यार्थी वंचित राहण्याची भीती!

Latest Marathi News Live Update: ठाणे सिव्हिल रुग्णालयात सात महिन्यात 4271 शस्त्रक्रिया यशस्वी

SCROLL FOR NEXT