Virat Kohli,Anil Kumble 
क्रीडा

T20 वर्ल्डकपनंतर अनिल कुंबळे टीम इंडियाचे मुख्य कोच?

कर्णधार कोहलीसोबतच्या मतभेदांमुळे कुंबळे प्रशिक्षकपदावरुन पायउतार झाले होते.

दीनानाथ परब

मुंबई: यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या आगामी टी२० वर्ल्डकप (T20 WC) स्पर्धेतनंतर रवी शास्त्री (Ravi shastri) मुख्य प्रशिक्षक पदावरुन पायउतार होतील. बीसीसीआय (BCCI) बरोबरचा त्यांचा करार संपणार आहे. शास्त्री यांनी स्वत:च वर्ल्डकप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक पदावर राहणार नसल्याचे संकेत दिले होते. रवी शास्त्रींनंतर आता मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या अनिल कुंबळे (Anil kumble) यांचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर आहे. त्यांची पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होऊ शकते.

रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक बनण्याआधी अनिल कुंबळे टीम इंडियाचे कोच होते. पण कर्णधार कोहलीसोबतच्या मतभेदांमुळे ते प्रशिक्षकपदावरुन पायउतार झाले होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात चांगली कामगिरी केली होती. आता दुसऱ्या कार्यकाळासाठी बीसीआयचा प्रस्ताव स्वीकारायचा की, नाही ते त्यांच्यावर अवलंबून आहे, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले.

शास्त्रींच्या पहिल्या कार्यकाळानंतर सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने अनिल कुंबळेची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली होती. कुंबळे यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली होती. पण चांगला रेकॉर्ड असूनही २०१७ मध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले. त्यामुळे कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडले. कुंबळे यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर काही खेळाडूंना आक्षेप होता. त्यामुळे कुंबळे यांनी राजीनामा दिला. त्यांच्याजागी रवी शास्त्रीची निवड झाली.

अनिल कुंबळे सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी काम करत आहेत. आगामी टी२० वर्ल्डकप नंतर टी२० संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच विराट कोहलीने जाहीर केले. त्यामुळे पुढच्या काही दिवसात भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT