Prithvi Shaw Controversy  esakal
क्रीडा

Prithvi Shaw Controversy : पृथ्वी शॉच नाही तर रोहित शर्मानेही दिला होता वात्रट फॅनला डोस

अनिरुद्ध संकपाळ

Prithvi Shaw Controversy : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने अनेक महिन्यानंतर भारतीय टी 20 संघात पुनरागमन केले. पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातला होता. त्यामुळे पृथ्वी शॉला भारतीय संघात परतावा म्हणून अनेक चाहते मागणी करत होते. पृथ्वी शॉने पुनरागमन केले. मात्र वादांनी काही त्याची पाठ सोडली नाही.

पृथ्वी शॉ आणि काही चाहत्यांमध्ये सेल्फी घेण्यावरून वाद झाला. हा वाद हाणामारीपर्यंत गेला. आता पृथ्वी शॉवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघातील फक्त पृथ्वी शॉबद्दल अशी घटना झालेली नाही तर रोहित शर्मापासून युवराज सिंग यांच्यापर्यंत अनेक खेळाडूंचा फॅन्ससोबत वाद झाला आहे.

रोहित शर्मा

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार नव्हता. रोहित शर्मा नेट्समध्ये फलंदाजी करत असताना एका चक्रम फॅनने रोहित शर्माला उकसवले होते. हिटमॅनने त्यावेळी या चाहत्याकडे दुर्लक्ष केले. मात्र हा फॅन काही थांबण्यास तयार नव्हता. वैतागलेल्या रोहित शर्माने या चाहत्यावर बॅट उगारत शांत बसण्यास सांगितले. तेथे भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रविण कुमार देखील उपस्थित होता. त्याने या फॅनला शिव्या देऊन पळवून लावले.

विराट कोहली

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा आपल्या आक्रमकतेसाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. विराट देखील आपल्या कारकिर्दिच्या सुरूवातीला फॅनसोबत भिडला होता. आयपीएल सुरू असताना विराट ड्रेसिंग रूममध्ये जात असताना स्टँडमधील चाहत्याने काहीतरी टिप्पणी केली होती. यावेळी विराट जाम भडकला होता. विराट कोहलीने या व्यक्तीला धमकी दिली होती. चाहत्यांनी याचा व्हिडिओ करून तो व्हायरल केला होता.

मोहम्मद शमी

मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेट संघातील एक शांत दिसणारा व्यक्ती आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी मोहम्मद शमीचा देखील आपल्यावरील ताबा सुटला. याला कारणीभूत हा एक पाकिस्तानी फॅन होता. त्याने भारतावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. शमीला देशाचा अपमान सहन झाला नाही. शमी मागे फिरला आणि त्या क्रिकेट चाहत्याकडे जात होता. मात्र धोनीने त्याला थांबवले आणि शांत केले.

पबमध्ये झाली होता वाद

भारतीय क्रिकेट संघ 2010 मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर होता. यावेळी टकिला नावाच्या एका पबमध्ये भारतीय संघातील खेळाडू आशिष नेहरा, जहीर खान, युवराज सिंग, रविंद्र जडेजा, पीयूष चावला आणि रोहित शर्मा गेले होते. तेथे काही चाहत्यांबरोबर युवराज सिंगचा वाद झाला होता. त्यावेळी हाणामारी देखील झाल्याचा आरोप झाला. मात्र युवराजने पबमध्ये मारामारी झाली नसल्याचे सांगितले.

(Sports Latest News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT