Novak Djokovic and Rohan Bopanna Video X/ATP
क्रीडा

Djokovic - Bopanna Video: आम्ही ओल्ड, पण गोल्ड...!, टेनिसमध्ये इतिहास रचणाऱ्या जोकोविच-बोपन्नाचा जगाला इशारा

Novak Djokovic and Rohan Bopanna: जोकोविच आणि बोपन्ना यांनी टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत एकेरी आणि दुहेरीत अव्वल क्रमांक पटकावत इतिहास रचले आहेत. त्यावर आता त्यांनी एकत्र मिळून प्रतिक्रियाही दिली आहे.

Pranali Kodre

Novak Djokovic and Rohan Bopanna Video: वय हा फक्त आकडा आहे, सातत्य असेल, तर यश मिळवता येते, हे दोन टेनिसपटूंनी गेल्या काही वर्षात दाखवून दिले आहे. हे दोन टेनिसपटू म्हणजे सार्बियाचा नोवाक जोकोविच आणि भारताचा रोहन बोपन्ना.

या दोन्ही दिग्गज टेनिसपटूंच्या नावावर सध्या एक मोठा विश्वविक्रम आहे. 36 वर्षीय जोकोविच नुकताच रॉजर फेडररला मागे टाकत जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये अव्वल क्रमांक पटकावणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.

तसेच 44 वर्षीय रोहन बोपन्नाही सध्या जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तोही दुहेरीत अव्वल क्रमांक मिळवणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू आहे. याच विक्रमाबद्दल आता जोकोविच आणि बोपन्ना यांनी एकत्र येत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते थोड्या गमतीनेही प्रतिक्रिया देताना दिसले आहेत. जोकोविच गमतीने म्हटले की 'यात समतोल नाही, हे अर्धे-अर्धे सुद्धा नाही. आमचे मिळून वय 80 आहे. पण मला वाटते आम्ही अजूनही भक्कम आहे.'

याशिवाय बोपन्ना त्यांच्या खेळाबद्दल म्हणाला की आता त्यांचा अनुभव कामाला येत आहे, तर जोकोविच म्हणाला, फक्त अनुभवच नाही, अजूनही खेळाबद्दल असलेले समर्पणही पुढे जाण्याची प्रेरणा देते. तो असंही म्हणाला की तो बोपन्नाला तासनतास जीममध्ये पाहिले आहे आणि आता तो पूर्वीपेक्षाही अधिक वेळ फिट राहण्यासाठी फिजिओबरोबर असतो.

त्याचबरोबर जोकोविचने असेही म्हटले की त्याला लवकरच भारतातही यायचे आहे.

तो म्हणाला, 'सर्बियन आणि भारतीय टेनिससाठी चांगले दिवस आहेत. आशा आहे की आपण भारतातही काहीतरी खास करू, आपण तिथे खेळू शकतो. मी त्यासाठी उत्सुक आहे. भारत खूप मोठा देश आहे, खूप लोकसंख्या आहे. तिथे टेनिसही वाढत आहे, जे आपल्या खेळासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि तू, भूपती, पेस, सानिया असे अनेकांनी टेनिससाठी योगदान दिले आहे.'

शेवटी जोकोविच म्हणाला, 'आम्ही ओल्ड आहोत, पण गोल्ड आहोत. आमच्याकडे अजून खूप वेळ आहे.'

सध्या मोंटे-कार्लो मास्टर्सही एटीपी स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत एकेरीत जोकोविच सहाभागी झाला आहे, तर बोपन्ना ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेनसह दुहेरीत सहभागी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT